Mango Export : अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांना भारतीय आंब्याची भुरळ, फळांचा राजा थेट व्हाईट हाऊसमध्ये..!

Mango Export : अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांना भारतीय आंब्याची भुरळ, फळांचा राजा थेट व्हाईट हाऊसमध्ये..!

यंदा जरी भारतामधील आंब्याने थेट व्हाईट हाऊस गाठले असले तरी गेली दोन वर्ष आंबा उत्पादकांसाठी खडतर होती. कोरोनामुळे आंब्याची निर्यातच झाली नव्हती. यंदा उत्पादनात घट झाली असली तरी अंतिम टप्प्यात निर्यातीला सुरवात झाली होती. त्याचा फायदा आंबा उत्पादकांना झाला आहे. उत्पादन घटल्याने दरही अधिकचा मिळाला आहे. बारामतीतील जळोची येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रेम्बो इंटरनॅशनल आणि महाराष्ट्र पणन विभागाने करार केला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

May 22, 2022 | 10:17 AM

बारामती : यंदा (Mango Production) आंबा उत्पादनात घट होऊन देखील चर्चा मात्र, त्याचीच आहे. यापूर्वी (Mango Export) आंबा निर्यातीमुळे उत्पादकांना दिलासा मिळाला होता पण राज्यातील प्रत्येक आंबा उत्पादकांना अभिमान वाटेल अशी घटना देखील यंदाच्या प्रतिकूल परस्थितीमध्ये घडली आहे. बारामतीमधील आंबा थेट व्हाईट हाऊसमध्ये पोहचला आहे. त्यामुळे भारतीय आंब्याची भुरळ (America) अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांना देखील असल्याचे समोर आले आहे. बारामती येथील रेम्बो इंटरनॅशनल एक्स्पोर्ट च्या माध्यमातून या आंब्याची निर्यात झाली आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झाली असली निर्यातीमुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

दोन वर्षापासून निर्यात होती बंद

यंदा जरी भारतामधील आंब्याने थेट व्हाईट हाऊस गाठले असले तरी गेली दोन वर्ष आंबा उत्पादकांसाठी खडतर होती. कोरोनामुळे आंब्याची निर्यातच झाली नव्हती. यंदा उत्पादनात घट झाली असली तरी अंतिम टप्प्यात निर्यातीला सुरवात झाली होती. त्याचा फायदा आंबा उत्पादकांना झाला आहे. उत्पादन घटल्याने दरही अधिकचा मिळाला आहे. बारामतीतील जळोची येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रेम्बो इंटरनॅशनल आणि महाराष्ट्र पणन विभागाने करार केला आहे. त्याच उद्देशाने अभिजित भसाळे हे रेम्बो इंटरनॅशनल माध्यमातून विविध ठिकाणी आंबा निर्यात केली जाते. बारामतीतून पणन आणि रेम्बो इंटरनॅशनलने 2015 पासून आंबा निर्यातिला सुरुवात केली आहे.

जगातील विविध ठिकाणी आंब्याची निर्यात

फळांचा राजा म्हणून आंब्याची ओळख आहे. आता हाच भारतातील आंबा हा अमेरिकेत पोहोचला आहे. बारामतीतील जळोची येथील रेम्बो इंटरनॅशनल एक्स्पोर्टने भारतातील आंबा हा थेट व्हाईट हाऊस मध्ये पोहोचला आहे.रेम्बो इंटरनॅशनलच्या मार्फत जगात विविध ठिकाणी भारतीय आंबा पोहोचवला जातो. आता भारतीय आंब्याची भुरळ अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या ऑफिसला देखील पडली आहे. त्यामुळे बारामतीच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला आहे. ही बाब आंबा उत्पादकांसाठी अभिमानास्पद असली तरी निर्यातीमध्ये वाढ आणि सातत्य ठेवणे गरजेचे आहे.

हे सुद्धा वाचा

निर्यातीमुळे आंबा उत्पादकांना दिलासा

हंगामाच्या सुरवातीपासून ते शेवटपर्यंत निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम हा आंबा पिकावर झालेलाच आहे. यातच दर्जा ढासळल्याने आंब्याची निर्यात होणार की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती. अखेर तिसऱ्या टप्प्यातील आंबा निर्यातीला सुरवात झाली होती. याचा फायदा आंबा उत्पादकांना झाला असून गेल्या दोन वर्षापासूनची मरगळ यंदा आंबा उत्पादकांनी झटकली आहे. शिवाय निर्यातीमुळे का होईना उत्पन्नात वाढ झाली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें