Video : पृथ्वीला ‘हृदय’ दिलेल्या प्राची सिंगचा नजर रोखून धरायला लावणारा ‘बेली डान्स’ पाहिलात?

पृथ्वी शॉ प्राची सिंग हे एकमेकांना डेट करतात, अशा चर्चा आहेत. परंतु दोघांनीही आपण डेट करत असल्याचं जाहीरपणे कबूल केलं नाही. असं असलं तरी जेव्हा कधीही पृथ्वी सुंदर बॅटिंग करतो त्यावेळी प्राची जाहीरपणे प्रेमाचा इजहार करत पृथ्वीला सोशल मीडियावावरुन का होईना 'हृदय' देते. (Prithvi Shaw GirlFriend Prachi Singh Belly Dance Video)

Video : पृथ्वीला 'हृदय' दिलेल्या प्राची सिंगचा नजर रोखून धरायला लावणारा 'बेली डान्स' पाहिलात?
पृथ्वी शॉ ची गर्लफ्रेंड प्राची सिंगचा खास बेली डान्स...

मुंबई : दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सलामीवीर आणि क्रिकेटमधलं भारताचं उद्याचं भविष्य असलेल्या पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) आयपीएलच्या 14 व्या पर्वात (IPL 2021) आपल्या बॅटची जादू दाखवली. सात सामन्यात त्याने शानदार तीन अर्धशतकं झळकावली. पृथ्वी आपल्या शानदार बॅटिंगने तर नेहमी चर्चेत असतो पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही लोक चर्चा करत असतात. पृथ्वी टीव्ही स्टार प्राची सिंगला (Prachi Singh) डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. प्राचीही अनेकवेळा पृथ्वीचं कौतुक करते. आयपीएलमधील पृथ्वीच्या दमदार कामगिरीनंतर तीन ते चार वेळा तिने इन्स्टा पोस्ट लिहून पृथ्वीच्या पाठीवर प्रेमाची आणि कौतुकाची थाप मारली. आता तिच्या एका डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियात सध्या धुमाकूळ घालतोय. (Prithvi Shaw GirlFriend Prachi Singh Belly Dance instagram Video)

प्राची सिंगने इन्स्टाग्रामवर एका डान्सचा व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओत ती बेली डान्स करताना दिसून येत आहे. अक्षय कुमारच्या ‘चांदणी चौक टू चायना’ या चित्रपटातील तेरे नैना मेरा नैना या गाण्यावर प्राचीने सुंदर डान्स केलाय. तिचा हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अनेकांनी तिच्या या डान्स कौशल्याचं कौतुक केलंय.

नेमकी कोण आहे प्राची सिंग?

प्राचीचा जन्म 22 जुलै 1995 रोजी मुंबई येथे झाला होता. प्राची ही छोट्या पडद्यावरची मॉडेल आणि अभिनेत्री आहे. 2019 मध्ये उडान सीरियलमधील वंशिका शर्माच्या भूमिकेत ती प्रथम कलर्स टीव्हीवर दिसली होती. तेव्हापासून तिच्या कामाला गती मिळाली.

पृथ्वी प्राचीमध्ये नातं काय?

पृथ्वी शॉ प्राची सिंग हे एकमेकांना डेट करतात, अशा चर्चा आहेत. परंतु दोघांनीही आपण डेट करत असल्याचं जाहीरपणे कबूल केलं नाही. असं असलं तरी जेव्हा कधीही पृथ्वी सुंदर बॅटिंग करतो त्यावेळी प्राची जाहीरपणे प्रेमाचा इजहार करत पृथ्वीला सोशल मीडियावावरुन का होईना हृदय देते.

प्राची उत्तम बेली डान्सर

अभिनयाबरोबरच प्राचीला डान्सची आवड आहे. ती उत्तम बेली डान्स करते. प्राचीच्या इन्स्टाग्राममध्ये तिचे डान्स व्हिडीओ पाहायला मिळतील. इन्स्टाग्रामवर तिचा चांगला फॅन फॉलोईंग आहे. 19.8 हजारांहुन अधिक लोक तिला इन्स्टाग्रामवर फॉलो करतात.

नृत्य आणि अभिनयाशिवाय फॅशनमध्येही प्राचीला आवड आहे. तिच्या इन्स्टाग्राम पोस्ट बघून तिच्या फॅशन सेन्सची जाणीव होते. तिला फॅशन वर्ल्डमध्ये सुद्धा खूप रस आहे. ती इन्स्टाग्रामवर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते आणि तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करते. आयपीएल -2020 सीझनपासून प्राची आणि पृथ्वीच्या डेटिंगबाबत चर्चा सुरू झाली होती. तेव्हापासून हे दोघंही सोशल मीडियावर एकमेकांचं कौतुक करताना दिसतात.

(Prithvi Shaw GirlFriend Prachi Singh Belly Dance instagram Video)

हे ही वाचा :

IPL Suspended : जॉस बटलरकडून भारतीय फलंदाज यशस्वी जैस्वालला खास भेट, ट्विटरवर शेअर केला फोटो

IPL 2021 : आयपीएल स्थगित झाल्यानंतरची सर्वांत मोठी बातमी, पोलिसांकडून 2 जणांना बेड्या, कारण काय?

IPL 2021 : कोरोनापुढे आयपीएल हरलं पण या खेळाडूंनी क्रिकेट रसिकांच्या हृदयावर राज्य केलं!

Published On - 3:02 pm, Wed, 5 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI