AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rishabh Pant | पंत म्हणजे डावखुरा सेहवाग, रिषभच्या आक्रमक फलंदाजीचा दिग्गज क्रिकेटपटू दिवाना

रिषभ पंतने (Rishabh Pant) इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत शानदार शतकी खेळी साकारली.

Rishabh Pant | पंत म्हणजे डावखुरा सेहवाग, रिषभच्या आक्रमक फलंदाजीचा दिग्गज क्रिकेटपटू दिवाना
रिषभ पंतने (Rishabh Pant) इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत शानदार शतकी खेळी साकारली.
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 08, 2021 | 6:51 PM
Share

मुंबई : “रिषभ पंत (Rishabh Pant) शानदार आहे. मी मोठया काळानंतर दबाव न घेता आक्रमकपणे खेळणारा खेळाडू पाहिला. इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत टीम इंडियाची 6 बाद 146 अशी (India vs England 4th Test) नाजूक स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर ज्या प्रमाणे पंत खेळला त्याला तोड नाही. पंतने जी कामगिरी केली तसं दुसरा कोणीच करु शकत नाही. तो जितक्या शानदारपणे वेगवान गोलंदाजांना खेळतो तितकाच चांगल्या रित्या तो फिरकीपटूंचा सामना करतो. मी पंतच्या शतकी खेळीचा आनंद लुटला. पंतची बॅटिंग पाहून असं वाटलं की जसं सेहवागच डाव्या हाताने खेळतोय”, अशा शब्दात पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने (inzamam ul haq) रिषभ पंतचं कौतुक केलं. इंझमाम त्याच्या युट्युब चॅनेवर बोलत होता. (Rishabh Pant is like that left handed Virender Sehwag said inzamam ul haq)

रिषभचे शानदार शतक

रिषभने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात शानदार शतक झळकावलं. पंतच्या कारकिर्दीतील हे तिसरं तर भारतातील पहिलं शतक ठरलं. पंतने टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक क्षणी शतक ठोकत टीम इंडियाचा डाव सावरला. त्याच्या या खेळीच्या जोरावर टीम इंडियाला 350 पेक्षा अधिक धावा करता आल्या.पंतला केलेल्या शतकी कामगिरीसाठी चौथ्या कसोटीत ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत

टीम इंडियाने या चौथ्या सामन्यात इंग्लंडवर डाव आणि 25 धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयासह 3-1 च्या फरकाने मालिकाही जिंकली. यासह टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात धडक मारली. त्यामुळे टीम इंडियाचा अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध मुकाबला होणार आहे. हा सामना जूनमध्ये खेळवण्यात येणार आहे.

2021 मध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय

रिषभ या 2021 वर्षात सातत्याने चांगली कामगिरी करतोय. त्याने ऑस्ट्रेलिया विरोधातील कसोटी मालिकेतही अफतालून परफॉरमन्स केला होता. पंत टीम इंडियाकडून कसोटीमध्ये 2021 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. पंतने या वर्षात आतापर्यंत एकूण 515 धावा केल्या आहेत. तर यादीत तिसऱ्या क्रमांकावर हिटमॅन रोहित शर्मा आहे. रोहितनेही 474 धावा केल्या आहेत.

कसोटीनंतर आता टी 20 मालिका

दरम्यान कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टी 20 मालिका पार पडणार आहे. हे सर्वच्या सर्व सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडणार आहेत. यामुळे या मालिकेतही पंतचा जलवा पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या :

Video | कीपिंग करताना स्टंपमागे तु फार बडबडतोस, रोहितच्या प्रश्नावर रिषभ काय म्हणाला?

(Rishabh Pant is like that left handed Virender Sehwag said inzamam ul haq)

Follow Us
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान