Sachin Tendulkar: असंच देव नाही म्हणत, जे कोणाच्या लक्षात आलं नाही ते सचिनच्या ध्यानात आलं, पोस्ट शेअर करत म्हणाला?
Sachin Tendulkar Post : सचिन तेंडुलकर यांची एक पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे. त्यांनी एक अशी गोष्ट निर्दशनास आणून दिली जी कोणाच्याच लक्षात आली नाही.

भारत आणि जपान यांच्यात खेळला गेलेला टी२० आंतरराष्ट्रीय सामना हा केवळ एक क्रिकेट सामना नव्हता, तर हा खेळ नवीन देशांमधील क्रिकेटबद्दल सुरु झालेला नवीन अध्याय आहे असून म्हणी शकतो. पावसामुळे बाधित झालेल्या पाच षटकांच्या सामन्यात जपानने टी२० विश्वविजेत्या भारतीय संघाला कडवी झुंज दिली. भारताने शेवटच्या चेंडूवर दोन धावांनी सामना जिंकला. पण या सगळ्या दरम्यान सचिन तेंडुलकरांनी केलेली एक पोस्ट आता चर्चेचा विषय बनत आहे.
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत, सचिन तेंडुलकरने जपान क्रिकेटच्या या विशेष उपक्रमाचे कौतुक केले. त्याने स्पष्ट केले की, स्टेडियममध्ये प्रवेश करणाऱ्या प्रेक्षकांना प्रवेशद्वारावर जपानी भाषेत क्रिकेट समजावून सांगणारी एक मार्गदर्शिका दिली जात होती. जे पहिल्यांदाच क्रिकेट पाहायला येत होते, त्यांना हा खेळ सहजपणे समजू शकत होता. सचिनने पोस्टमध्ये लिहिले, “क्रिकेटला एक नवीन घर मिळताना पाहून खूप विशेष वाटते. भारत आणि जपान यांच्यातील सामना शानदार होता, पण मला सर्वात जास्त आनंद या गोष्टीचा झाला की, खेळाबद्दल समजावून सांगण्यासाठी प्रेक्षकांना एक माहितीपूर्ण पॅम्पलेटचे वाटप केले गेले. आपण सर्वांनी कधी ना कधी आपला पहिला क्रिकेट सामना पाहिला आहे. अधिकाधिक लोकांना त्यांचा पहिला क्रिकेट सामना अनुभवताना पाहून खूप आनंद होतो.”
There’s something very special about watching cricket find new homes.
Seeing India play Japan is wonderful in itself, but what made me smile was seeing reckoners being given to the audience at the entrance so they could understand the game better.
We’ve all had our first… pic.twitter.com/1d79UxIziG
— Sachin Tendulkar (@sachin_rt) September 22, 2026
या मार्गदर्शिकांमध्ये क्रिकेटचे मूलभूत नियम, मैदानाची रचना, धावा कशा केल्या जातात, फलंदाज कसा बाद होतो आणि पंचांच्या संकेतांचा अर्थ याबद्दल माहिती समाविष्ट होती. त्यात धावफलक कसा वाचावा आणि समजून घ्यावा हेदेखील समजावून सांगितले होते. सचिनने जपानी संघाचे कौतुक करत लिहिले, आव्हानाचा स्वीकार करून शौर्याने लढा दिल्याबद्दल जपानी संघ श्रेयस्कर आहे.”
भारतीय संघाने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला. पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला आणि प्रत्येकी ५ षटकांचा करण्यात आला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना, भारतीय संघाने ५ षटकांत ४ गडी गमावून केवळ ३२ धावा केल्या. ३० चेंडूंमध्ये फक्त चौकार मारले गेले. सलामीवीर अभिषेक शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद झाला, तर कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक १६ धावा केल्या. जपानची सर्व षटके फिरकी गोलंदाजांनी टाकली. चार्ली हारा हिंझेने दोन बळी घेतले, तर इब्राहिम तकाहाशी आणि बेंजामिन इटो-डेव्हिस यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. जपानला तीन गडी गमावून केवळ ३० धावाच करता आल्या. कर्णधार केंडेल फ्लेमिंगने सर्वाधिक १२ धावा केल्या. अक्षर पटेलने शेवटच्या षटकात आठ धावांचा बचाव केला.