Virat Kohli Resign: ‘मी तुझ्या शेजारी होते, तुझ्या डोळ्यात अश्रू होते’ विराटसाठी अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट

, एमएस, तू आणि मी नंतर चॅटिंग करत होतो. त्यावेळी तो मस्करी मध्ये म्हणाला होता, विराटची दाढी आता लवकरच सफेद होईल. आपण सगळेच त्यावर हसलो होतो.

Virat Kohli Resign: 'मी तुझ्या शेजारी होते, तुझ्या डोळ्यात अश्रू होते' विराटसाठी अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 4:47 PM

मुंबई: विराट कोहलीने (Virat Kohli) काल सोशल मीडियावर एक स्टेटमेंट पोस्ट करुन कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. विराटचा हा निर्णय लाखो क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. पण त्याचवेळी विराटचे सहकारी, हितचिंतक आणि अन्य दिग्ग्जांनी पुढील वाटचालीसाठी विराटला शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सुद्धा आहे. अनुष्काने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केलीय. यामध्ये विराट कर्णधार झाल्यापासून आतापर्यंतच्या त्याच्या प्रवासात त्याने मिळवललेलं यश, आव्हान आणि अपयश या बद्दल अनुष्काने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अनुष्का म्हणते…. “2014 मधला मला तो दिवस लक्षात आहे, जेव्हा तू कर्णधार म्हणून तुझी निवड झाल्याचं मला सांगितलं होतस. धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मला लक्षात आहे, एमएस, तू आणि मी नंतर चॅटिंग करत होतो. त्यावेळी तो मस्करी मध्ये म्हणाला होता, विराटची दाढी आता लवकरच सफेद होईल. आपण सगळेच त्यावर हसलो होतो. त्यादिवसापासून तुझी दाढी सफेद होण्याशिवाय मी बरच काही बघितलं आहे” असं अनुष्काने लिहिलं आहे.

“मी तुला प्रगती करताना पाहिलं. “भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून तू जी प्रगती केलीस आणि तुझ्या नेतृत्वाखाली संघाने जे यश मिळवलं, त्याचा मला अभिमान आहेच. पण तू तुझ्या स्वत:मध्ये जी प्रगती केलीस, त्याचा मला जास्त अभिमान आहे” असे अनुष्का शर्माने म्हटलं आहे.

“2014 मध्ये आपण खूप तरुण आणि भोळेभाबडे होतो. चांगला हेतू, सकारात्मक ऊर्जा आणि प्रोत्साहनामुळे आयुष्यात आपण पुढे जातो, असा आपण विचार करायचो. हे बरोबर आहे पण पुढे जाण्यासाठी आव्हान सुद्धा महत्त्वाची असतात. बहुतांश आव्हानांचा तुला फक्त मैदानावरच सामना करावा लागला नाही. पण हे आयुष्य आहे? जिथे फार कमी अपेक्षा असतात. तिथे तुमची परीक्षा घेतली जाते” असं अनुष्काने लिहिलं आहे.

“तुझे जे चांगले हेतु होते, त्या मध्ये तू काही येऊ दिलं नाहीस, याचा मला अभिमान आहे. तू उदहारण देऊन नेतृत्व केलस. मैदानावर विजयासाठी पूर्ण ऊर्जा झोकून दिलीस. काही पराभवानंतर मी तुझ्या शेजारी बसली होती. त्यावेळी तुझ्या डोळ्यात अश्रू होते. यापेक्षा विजयासाठी अजून जास्त काय करु शकतो हाच विचार तुझ्यामध्ये असायचा. असा विचार करणारा विराट आहे. प्रत्येकाकडून अशीच अपेक्षा करतोस” असे अनुष्का शर्माने म्हटलं आहे.

(Sat next to you with tears in your eyes Anushka recalls Virat Kohli’s journey)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.