मोठी बातमी! महाराष्ट्राची लेक टीम इंडियाची कर्णधार, बीसीआयकडून घोषणा

बीसीसीआयने स्मृती मानधनाची एकदिवसीय आणि टी-२० संघांची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. आता हरमनप्रीत कौर केवळ कसोटी संघाचे नेतृत्व करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी! महाराष्ट्राची लेक टीम इंडियाची कर्णधार, बीसीआयकडून घोषणा
Smriti Mandhana Team India Captain
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 06, 2026 | 10:03 PM

हरमनप्रीतने कर्णधारपद सोडल्यानंतर महिला क्रिकेट संघाची नवी कर्णधार कोण याची चर्चा सुरु होती. पण आता याचं भारतीय उत्तर क्रिकेटच्या चाहत्यांना मिळालं आहे. स्मृती मानधना आता टीम इंडियाची नवी कर्णधार असणार आहे. बीसीसीआयने गुवाहाटी येथे झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मानधना दीर्घकाळापासून संघाची उपकर्णधार म्हणून कार्यरत होती. ती हरमनप्रीतच्या मार्गदर्शनाखाली खूप काही शिकली आहे. तसेच हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत वेळोवेळी संघाचे नेतृत्वही केले आहे. रॉयल ​​चॅलेंजर्स बंगळुरूला २०२४ आणि २०२६ मध्ये महिला प्रीमियर लीगचे (WPL) विजेतेपद मिळवून देऊन तिने कर्णधार म्हणून आपली क्षमता यापूर्वीच सिद्ध केली आहे. स्मृती २०१३ पासून भारतीय संघाचा भाग आहे आणि या भूमिकेसाठी तिच्याकडे दांडगा अनुभव आहे.

दरम्यान, सध्या तरी, मानधनाची एकदिवसीय (ODI) आणि टी-२० (T20) फॉरमॅटसाठी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तिने यापूर्वी १८ टी-२० आंतरराष्ट्रीय आणि ४ एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे.

Loading...

बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मिन्हास आणि सचिव जयदीप सैकिया यांनी स्मृती मानधना यांची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यामागची कारणेही स्पष्टपणे सांगितले आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मिन्हास यांनी मानधनाच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आणि तिने स्वतःला यापूर्वीच सिद्ध करून दाखवल्याचे सांगितले. मिन्हास म्हणाले, “भारतीय महिला क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आल्याबद्दल मी स्मृती मानधनाचे अभिनंदन करतो. ती अनेक वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा एक महत्त्वाचा भाग राहिली आहे. आणि नेतृत्वासाठी आवश्यक गुण वेळोवेळी सिद्ध केले आहेत.” त्यांनी पुढे सांगितले की, “बीसीसीआयचा स्मृतीवर पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे की, आपल्या कारकिर्दीत ज्या किर्तीचे दर्शन तिने घडवले आहे, त्याच क्षमतेने ती ही जबाबदारीदेखील पार पाडेल.”

कर्णधारपदाची जबाबदारी दिल्यानंतर  “बीसीसीआय, निवड समिती, माझ्या सहकारी खेळाडू आणि माझ्या या प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्या व माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या प्रत्येकाची मी आभारी आहे. मी माझे सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया स्मृतीने दिल्याची माहिती आहे. दरम्यान, स्मृती मानधना ही महाराष्ट्रातील सांगलीतील आहे. तीन वर्षांची असताना तिचं कुटुंब मुंबईत स्थलांतरीत झाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us