AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020, SRH vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची विजयी सुरुवात, सनरायजर्स हैदराबादवर 10 धावांनी मात

बंगळुरुच्या युझवेंद्र चहलला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (Royal Challengers Bangalore Beat Sunrisers Hyderabad By 10 Run)

IPL 2020, SRH vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची विजयी सुरुवात, सनरायजर्स हैदराबादवर 10 धावांनी मात
| Updated on: Oct 16, 2020 | 1:00 PM
Share

दुबई : रॉयस चॅलेंजर्स बंगळुरुने ( Royal Challengers Bangalore ) आयपीएलच्या 13 व्या मोसमाची विजयी सुरुवात केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायझर्स हैदराबादचा ( Sunrisers Hyderabad ) 10 धावांनी पराभव केला आहे. (Royal Challengers Bangalore Beat Sunrisers Hyderabad By 10 Run )

बंगळुरुने हैदराबादला विजयासाठी 164 धावांचे आव्हान दिले होते. मात्र बंगळुरुने हैदराबादला 153  धावांवर ऑलआऊट केले. हैदराबादला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आले नाही. हैदराबादकडून जॉन बॅरिस्टोने सर्वाधिक 61 धावा केल्या. तर बंगळुरुकडून फिरकीपटू युझवेंद्र चहलने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर नवदीप सैनी आणि शिवम दुबे या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट घेत चांगली साथ दिली.

विजयी आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या हैदराबादची सुरुवात फारशी चांगली राहिली नाही. दुसऱ्याच ओव्हरमध्ये चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात कर्णधार डेव्हिड वॉर्नर रनआऊट झाला. यानंतर जॉनी बेअरिस्टो आणि वनडाऊन आलेल्या मनिष पांडेनी दुसऱ्या विकेटसाठी 71 धावांची चांगली भागीदारी केली. ही जोडी तोडायला युझवेंद्र चहलला यश आले. त्याने मनिष पांडेला नवदीप सैनीच्या हाती कॅचआऊट केले.

विकेट जात असतानाच दुसऱ्या बाजूला जॉन बेअरिस्टो मैदानाला चिपकून होता. जॉन हैदराबादला सावरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्यालाही फार वेळ टिकता आले नाही. जॉनला युझवेंद्र चहलने 61 धावांवर बोल्ड केले.

यानंतर हैदराबादची घसरण सुरु झाली. बंगळुरुच्या गोलंदाजीसमोर एकाही खेळाडूला तग धरता आला नाही. विशेष म्हणजे 3 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. तर 5 बॅट्समनना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

दरम्यान याआधी हैदराबादने नाणेफेक जिंकून बंगळुरुला फलंदाजी करण्यास भाग पाडले. बंगळुरुची दमदार सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी देवदत्त पडिक्कल आणि एरॉन फिंचने 90 धावांची सलामी भागीदारी केली.

पडिक्कल आणि फिंच या जोडीला तोडायला विजय शंकरला यश आले. शंकरने पडिक्कला 56 धावांवर बाद केले. यामागोमाग फिंचनेही विकेट टाकली. कर्णधार विराट कोहलीला आपल्या लौकीकाला साजेशी खेळी करता आली नाही. विराटही 14 धावा करुन माघारी परतला.

यानंतर एबी डीव्हिलियर्सने तडाखेदार खेळी करत दमदार अर्धशतक ठोकले. बंगळुरुकडून देवदत्त पडिक्कल आणि एबीडी डिव्हिलियर्सने अर्धशतकी खेळी केली. तर हैदराबादकडून अभिषेक शर्मा, विजय शंकर आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (Royal Challengers Bangalore Beat Sunrisers Hyderabad By 10 Run )

[svt-event title=”युझवेंद्र चहल ठरला सामनावीर” date=”22/09/2020,12:26AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुचा हैदराबादवर 10 धावांनी विजय ” date=”21/09/2020,11:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svtimeline][/svtimeline][svt-event title=”बंगळुरुला विजयासाठी 1 विकेटची आवश्यकता” date=”21/09/2020,11:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला आठवा दणका” date=”21/09/2020,11:26PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला सातवा झटका ” date=”21/09/2020,11:22PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला सहावा दणका ” date=”21/09/2020,11:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला पाचवा धक्का” date=”21/09/2020,11:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादची चौथा विकेट” date=”21/09/2020,11:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला मोठा धक्का, जॉन बेरिस्टो माघारी ” date=”21/09/2020,11:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला विजयासाठी शेवटच्या 30 बॉलमध्ये 43 धावांची गरज” date=”21/09/2020,10:55PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”जॉनी बॅयरिस्टोचे दमदार अर्धशतक” date=”21/09/2020,10:45PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला दुसरा धक्का” date=”21/09/2020,10:37PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”10 ओव्हरनंतर हैदराबादची धावसंख्या” date=”21/09/2020,10:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी” date=”21/09/2020,10:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पाच ओव्हरनंतर हैदराबादची धावसंख्या” date=”21/09/2020,9:56PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला पहिला झटका” date=”21/09/2020,9:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादला विजयासाठी 164 धावांचे आव्हान” date=”21/09/2020,9:22PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला दुसरा धक्का ” date=”21/09/2020,9:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुला पहिला दणका ” date=”21/09/2020,8:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”देवदत्त पडीक्कलचे दमदार अर्धशतक” date=”21/09/2020,8:24PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”RCB ची दमदार सुरुवात” date=”21/09/2020,7:58PM” class=”svt-cd-green” ] RCB ची दमदार सुरुवात, पाच षटकात बिनबाद 48 धावा [/svt-event]

[svt-event title=”बंगळुरुचे 11 शिलेदार” date=”21/09/2020,7:38PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हैदराबादचे अंतिम 11 खेळाडू ” date=”21/09/2020,7:27PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकला ” date=”21/09/2020,7:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”थोड्याच वेळात होणार टॉस ” date=”21/09/2020,6:49PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”SRH vs RCB Live Score : पहिल्या सामन्यात कोण ठरणार वरचढ ?” date=”21/09/2020,6:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.