
T20 World Cup 2026 : आयसीसी मेन्स T20 वर्ल्डकप स्पर्धेत सुपर 8 मध्ये इंग्लंडने पाकिस्तानचा पराभव केला. या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघ अतिशय कठीण काळातून जात आहे. मैदानावरील पराभवाचा परिणाम आता मैदानाबाहेरही जाणवू लागला आहे. खेळाडूंवर तर टीका केली जात आहेच., पण त्यांच्या घरच्यांनाही याची झळ सोसावी लागत आहे. पाकिस्तानी संघाचा कर्णधार सलमान अली आगा याच्याविरुद्धचा राग इतका वाढला आहे की काही चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्या कुटुंबालाही टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे.
पाक कर्णधाराची पत्नी भडकली
कोणत्याही सामन्यात पराबव झाल्यावर त्या संघाच्या खेळाडूंना टीकेचा सामना करावा लागतो, पण यावेळेस प्रकरण जरा जास्तच वाढलं. रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानी संघाचा कॅप्टन सलमान याची पत्नी, सब्बा मंझर आणि त्यांच्या धाकट्या मुलाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह मेसेज पाठवण्यात आले, तसेच शिवीगाळही करण्यात आली. सतत होणारी टीका, खालच्या थरातले मेसेजेस, ट्रोलिंग यामुळे पार कर्णधाराची पत्नी चांगलीच संतापली असून सब्बा मंझरन हिने मौन सोडत ट्रोलर्सवर निशाणा साधला. तिने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं. मला किंवा माझ्या निरागस मुलाला शिव्या घालून, टीका करून पाकिस्तानी संघ, टी 20 वर्ल्ड कप जिंकू शकणार नाहीये, असं तिने लिहीलं. तिची ही पोस्ट आता खूप व्हायरल झाली आहे.
खेळाडूंच्या कुटुंबापर्यंत पोचली रागाची झळ
इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचे उपांत्य फेरीत पोहोचण्याचे स्वप्न भंगलेलं दिसंतय. पाकिस्तानी संघाच्या कामगिरीमुळे चाहते निराश आहेत, ज्यामुळे सोशल मीडियावर अनेक अनामिक अकाऊंट्सवरून खेळाडूंच्या कुटुंबियांना ट्रोल केलं जात आहे. आजकाल हाँ एक चिंताजनक ट्रेंड बनला आहे. क्रिकेट तज्ज्ञ म्हणतात की, मैदानावरील कामगिरीबद्दल टीका करणे हा खेळाचा एक भाग आहे, परंतु खेळाडूंच्या कुटुंबियांना आणि मुलांना लक्ष्य करणे हे खेळाच्या भावनेविरुद्ध आहे. यामुळे खेळाडूंवर मानसिक दबावही वाढतो, ज्यामुळे भविष्यातील सामन्यांमध्ये संघाच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो असं त्यांनी नमूद केलं.
कॅप्टनची कमकुवत खेळी
या स्पर्धेत सलमान अली आगाची कामगिरी आतापर्यंत शांत राहिली आहे, त्याने पाच डावांमध्ये 12 च्या सरासरीने आणि 136 च्या स्ट्राईक रेटने फक्त 60 धावा केल्या. संघाच्या पराभवासाठी कर्णधाराला जबाबदार धरलं जातयं, पण सोशल मीडियावरील वाढते वैयक्तिक हल्ले क्रिकेटच्या व्याप्तीबाहेर आहेत. पाकिस्तान संघ या दबावाचा कसा सामना करतो आणि भविष्यातील सामन्यांमध्ये तो पुनरागमन करू शकेल का हे पाहणं महत्वाचं ठरेल.