Tokyo Olympics : ‘हिंदुस्तानी वे’, भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नवं गाणं, क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी केलं उद्घाटन

| Updated on: Jul 14, 2021 | 7:58 PM

टोक्यों ऑलम्पिकमध्ये एकूण 18 प्रकारच्या खेळांमध्ये 126 भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. या सर्व खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे गाणं तयार करण्यात आलं आहे.

Tokyo Olympics : ‘हिंदुस्तानी वे’, भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नवं गाणं, क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी केलं उद्घाटन
भारताचे 126 खेळाडू टोक्यो ऑलम्पिकमध्ये सामिल होणार आहेत.
Follow us on

नवी दिल्ली : टोक्यो ऑलम्पिक (Tokyo Olympics)  सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यसाठी भारत सरकारने  ऑफिशियल गाणं लॉन्च केलं आहे. केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर (Anurag Thakur) यांनी आज हे गाणं लॉन्च केलं असून ‘हिंदुस्तानी वे’ असं या गाण्याचं नाव आहे. प्रसिद्ध गायक आणि कम्पोजर ए आर रेहमान (A R rehman) आणि अनन्या यांनी मिळून हे गाणं तयार केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सुरु केलेल्या #cheer4india अभियानातंर्गतच हे गाणं तयार केलं गेलं आहे.

अनुराग ठाकुर हे या गाण्याच्या लॉन्च दरम्यान म्हणाले की,”माझी इच्छा आहे प्रत्येक भारतीयाने हे गाण ऐकाव. प्रत्येकाने या गाण्याला शेअर करुन भारताची जयजयकार करावी. हे गाणं तयार केल्याबद्दल अनन्या आणि ए आर रेहमान यांचे धन्यवाद” टोक्यो ऑलम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धांना 23 जुलैपासून जपानच्या टोक्यो शहरात सुरुवात होणार आहे. 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान चालणाऱ्या या स्पर्धांसाठी भारत आपले आघाडीचे 126 खेळाडू पाठवणार आहे. 17 जुलैला हे सर्वजण टोक्योसाठी रवाना होणार आहेत.

18 खेळांध्ये 126 खेळाडू खेळणार

टोक्यों ऑलम्पिकमध्ये एकूण 18 प्रकारच्या खेळांमध्ये भारतीय  खेळाडू सहभाग घेणार आहेत. यावेळी स्पर्धेसाठी गेलेल्या भारतीय खेळाडूंची एकूण संख्या 126 आहे. यावेळी भारताला ऑलम्पिकमध्ये सर्वाधिक पदक मिळण्याची शक्यता निशानेबाजी, तिरंदाजी आणि कुस्ती या खेळात आहे. भारतीय हॉकी संघाची कामगिरी पाहता त्यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.  भारताची महिला तिरंदाज दीपिका कुमारी टोक्यो ऑलम्पिकपूर्वीच जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर आली असल्याने देशाला तिच्याकडून खूप अपेक्षा आहेत.

हे ही वाचा :

Tokyo Olympic च्या 9 दिवसांपूर्वी हॉकीच्या नियमांत मोठा बदल, कोरोनाच्या संकटामुळे घेतला निर्णय

Tokyo Olympics 2021 मधून दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररची माघार, ‘हे’ आहे कारण

Tokyo Olympics 2020 मध्ये सहभागी होणाऱ्या उत्तर प्रदेशातील खेळाडूंसाठी खुशखबर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची मोठी घोषणा

(Indias Union Sports Minister Anurag Thakur launches hindustani way Song as Indias official Olympic Song created by A R rehman)