Tokyo Olympics 2021 मधून दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररची माघार, ‘हे’ आहे कारण

तब्बल 20 वेळा ग्रँड स्लॅम विजेता स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर मागील काही काळापासून टेनिस कोर्टावर आपली जादू बिखेरु शकलेला नाही. आता त्याने टोक्यो ऑलम्पिकमधूनही माघार घेतली आहे.

Tokyo Olympics 2021 मधून दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररची माघार, 'हे' आहे कारण
रॉजर फेडरर
Follow us
| Updated on: Jul 14, 2021 | 10:59 AM

बेसल : टोक्यो ऑलम्पिकची (Tokyo Olympics 2021) तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून सर्व प्रकारच्या खेळातील खेळाडूंच्या पात्रता फेऱ्याही पार पडल्या आहेत. दरम्यान टेनिस स्पर्धेमध्ये दिग्गज टेनिसपटू खेळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून असताना नुकताच विम्बल्डन जिंकलेल्या नोव्हाकने अद्याप निर्णय़ झाला नसल्याचे सांगितले. तर दुसरीकडे स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर (Roger Federer) यानेही टोक्यो ऑलम्पिकमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. फेडररने ट्विट करत याबाबतची माहिती दिली. (Swiss Tennis Star Roger Federer Pulls Out of Tokyo Olympics 2021 due to Knee Injury)

फेडररने गुढघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्याचे सांगितले आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या ग्रँड स्लॅम विम्बल्डन स्पर्धेतही क्वॉर्टर फायनलमध्ये पोलंडच्या हुबर्ट हुरकाज याने 6-3, 7-6 (7/4), 6-0 अशा तीन सेट्समध्ये रॉजरला नमवत स्पर्धेबाहेर केले होते. फेडरर याने लंडनच्या ऑलम्पिक 2012 मध्ये रौप्य पदक पटकावले होते. तसेच बीजिंग ऑलम्पिक 2008 मध्येही युगल वर्गात त्याने सुवर्ण पदक पटकावलं होतं.

काय म्हणाला रॉजर?

फेडरर म्हणाला, “ग्रास कोर्टावर खेळताना दुर्देवाने माझ्या गुडघ्याला दुखापत धाली. त्यामुळे टोक्यो ऑलम्पिकमधून मी माघार घेत आहे. मी ऑलम्पिकमध्ये माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करु शकणार नसल्याने मी निराश आहे. मी सध्या पुढील स्पर्धांसाठी तयारीच्या दृष्टीने सराव करत आहे आणि संपूर्ण स्वित्झर्लंड संघाला माझ्याकडून शुभेच्छा.”

नदाल, सेरेना यांनीही घेतली माघार

फेडररच्या आधीच दिग्गज खेळाडू राफेन नदाल (Rafeal Nadal) आणि महिलाी चॅम्पियन सेरेना विल्यम्स (Serena Williams) यांनीही टोक्यो ऑलम्पिकमधून माघार घेतली आहे.

हे ही वाचा :

Tokyo Olympics 2020 मध्ये खेळण्याबाबत नोव्हाक जोकोविच याचे मोठे वक्तव्य, म्हणाला…

Tokyo Olympics 2020 मध्ये सहभागी होणाऱ्या उत्तर प्रदेशातील खेळाडूंसाठी खुशखबर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची मोठी घोषणा

Tokyo Olympics 2020 : 5 व्या वर्षी अनाथ, मजुरी करणाऱ्या आजीने सांभाळलं, सरावासाठी शूजही नव्हते, आता भारताकडून ऑलम्पिक गाजवणार

(Swiss Tennis Star Roger Federer Pulls Out of Tokyo Olympics 2021 due to Knee Injury)

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.