Vaibhav Sooryavanshi: अरे रिलच्या नादात…वैभव सूर्यवंशीला राग अनावर, दिल्ली एअरपोर्टवरचा Video Viral

Vaibhav Sooryavanshi Video Viral: वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात तो दिल्ली विमानतळावर पॅपराझींवर संतापला असल्याचे पाहायला मिळाले.

Vaibhav Sooryavanshi: अरे रिलच्या नादात...वैभव सूर्यवंशीला राग अनावर, दिल्ली एअरपोर्टवरचा Video Viral
| Updated on: Oct 16, 2026 | 10:29 AM

Vaibhav Sooryavanshi Video: भारतीय पुरुष क्रिकेट संघ काल दिल्लीत पोहोचले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांना काल मोदी यांनी सन्मानित केले. यासाठी दिल्ली एअरपोर्टवर जेव्हा भारतीय संघ पोहोचला तेव्हा वैभव सूर्यवंशीने एका पॅपराझीला चांगलंच सुनावले. ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

२०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या भारतीय पुरुष क्रिकेट संघासोबत वैभव सूर्यवंशी नवी दिल्लीत दाखल झाला, जिथे सत्कार समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार होता. विमानतळावर वैभवला कॅमेरामॅननी घेरले आणि फोटो व व्हिडिओ काढायला सुरुवात केली. वैभवने कॅमेरामॅनला येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांपासून दूर राहण्याचा सक्त सल्ला दिला. वैभव दिल्ली विमानतळावर पापाराझींना म्हणाला, “तुम्ही रील्सच्या नादात कोणीतरी तुम्हाला ठोकेल.”आता वैभवचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Loading...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेजर ध्यानचंद स्टेडियमवर २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतासाठी पदक जिंकलेल्या पदकवीरांची भेट घेतली आणि त्यांना प्रोत्साहन दिले.  पंतप्रधान मोदी म्हणाले, “या आशियाई क्रीडा स्पर्धेतील अनेक भारतीय खेळाडू १५-१७ वर्षांचे होते. इतक्या लहान वयात या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने देशाला गौरव मिळवून दिला. त्यांनी देशवासियांची मने जिंकली. यावरून हे दिसून येते की यशासाठी वयाची मर्यादा नसते. लहान वयात खेळाला सुरुवात करणे हा एक अतिरिक्त फायदा आहे.” हे ऐकून वैभव सूर्यवंशीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

 

भारतीय पुरुष क्रिकेट संघाने गोल्ड मेडल जिंकले. भारतीय पुरुष क्रिकेट संघाने फायनल सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला आणि सामना जिंकला. भारताने फायनलमध्ये पाकिस्तानला पराभवाचा धक्का देणे हे भारतीय चाहत्यांसाठी पर्वणीच. तर महिला क्रिकेट संघानेही गोल्ड मेडल जिंकले. इतर स्पर्धेतील स्पर्धकही यावेळी उपस्थित होते. त्यांचीही मोदी यांनी भेट घेतली, फोटोशूट केले आणि सर्वांचे कौतुक केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us