AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi: पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करत होते, सगळे शांतपणे ऐकत होते पण वैभवला मात्र हसू अनावर, Video Viral

Vaibhav Sooryavanshi Video Viral: वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असताना वैभव सूर्यवंशीने काय केले ते पाहा...

Vaibhav Sooryavanshi: पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करत होते, सगळे शांतपणे ऐकत होते पण वैभवला मात्र हसू अनावर, Video Viral
| Updated on: Oct 16, 2026 | 8:21 AM
Share

PM Modi To Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीने आपल्या दमदार फलंदाजीच्या शैलीमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता मिळवली आहे. अनेक दिग्गज लोकही त्याच्या फलंदाजीचे चाहते झाले आहे.  अनेकांनी त्याच्या खेळाचे कौतुक केले आहे.  आता तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीही वैभवचे फॅन झाल्याचे पाहायला मिळाले. गुरुवारी, पंतप्रधान मोदींनी २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंची भेट घेतली. यामध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघातील खेळाडूंचाही समावेश होता.

पंतप्रधान मोदींनी नमूद केले की, आशियाई क्रीडा स्पर्धेतील काही पदक विजेते १५-१७ वर्षांचे आहेत. ते म्हणाले की, “या सर्व खेळाडूंनी देशाला अभिमान मिळवून दिला आहे.” त्यांनी हे बोलताच कॅमेरा वैभव सूर्यवंशीकडे वळला. पंतप्रधानांच्या कौतुकावर या १५ वर्षीय मुलाची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेत टीम इंडियाचे अनेक खेळाडू १५-१७ वर्षांचे होते. इतक्या लहान वयात या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने देशाला अभिमान मिळवून दिला आहे. त्यांनी देशवासियांची मने जिंकली आहेत.” हे ऐकून वैभव हसताना दिसला.

पंतप्रधान मोदी यांनी असेही म्हटले की, “यशासाठी वय हा अडथळा ठरू नये. लवकर सुरुवात करणे नंतर फायद्याचे ठरू शकते आणि म्हणूनच, अगदी लहान वयातच प्रतिभा ओळखली पाहिजे.  ‘खेलो इंडिया’ आणि ‘इमर्जिंग स्पोर्ट्स इंडिया’ अंतर्गत येत्या काही वर्षांत हजारो खेळाडूंना संधी मिळेल.

सीडेड सिस्टीमनुसार भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवला होता. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि श्रेष्ठ रँकिंगच्या आधारावर भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला. भारताने उपांत्य फेरीत श्रीलंकेला १२४ धावांनी पराभूत केले आणि अंतिम सामन्यात पाकिस्तानवर १९ धावांनी विजय मिळवून सुवर्णपदक जिंकले. वैभव सूर्यवंशीने दोन डावांत ५३ धावा केल्या. केवळ पुरुष संघच नाही, तर भारतीय महिला क्रिकेट संघानेही सुवर्णपदक जिंकले. महिला संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेला १४७ धावांनी ऐतिहासिक पराभव दिला.

Follow Us
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!