IND vs NZ : न्यूजीलंडमध्ये मैदानावर उतरताच वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास, बनवला महारेकॉर्ड
IND vs NZ 2nd T20i : भारत आणि न्यूझीलंडमध्ये पाच टी20 सामन्यांची सीरीज सुरु आहे. आज दुसरा सामना होतोय. वैभव सूर्यवंशीला प्लेइंग इलेवनमध्ये संधी मिळाली आहे. तो मैदानावर उतरताच एक नवीन इतिहास रचला गेला.

ईशान किशनला झालेली दुखापत वैभव सूर्यवंशीच्या पथ्यावर पडली. त्याला आज प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात मैदानावर उतरताच वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला आहे. 15 वर्ष 211 दिवस वय असलेला वैभव न्यूझीलंडच्या भूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात युवा पुरुष क्रिकेटर बनला आहे. या उपलब्धीसह त्याने बांग्लादेशी आणि पाकिस्तानी खेळाडूंना मागे टाकलं.
वैभवच्या आधी हा रेकॉर्ड बांग्लादेशच्या मोहम्मद शरीफच्या नावावर होता. 18 डिसेंबर 2001 रोजी हॅमिल्टन टेस्ट मॅचमध्ये खेळताना शरीफचं वय 16 वर्ष 6 दिवस होतं. पाकिस्तानचा आकिब जावेद 16 वर्ष 185 दिवस वय असताना खेळले होते. सचिन तेंडुलकर 16 वर्ष 284 दिवस वय असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून डेब्यू केलेला.
टॉस जिंकून पहिली गोलंदाजी
भारताने दुसऱ्या टी20 मॅचमध्ये टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉसच्यावेळी श्रेयसने सांगितलं की, “ईशान किशनला दुखापत झालीय. त्यामुळे वैभव सूर्यवंशीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलाय. वैभव तिसऱ्या नंबरवर फलंदाजीला येईल. याच सामन्यात प्रिन्स यादव आणि मयंकला संधी मिळाली” टीम इंडियाने पहिला सामना जिंकू मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सीरीजमधील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला विजयासाठी अवघड 226 धावांचं टार्गेट मिळालं होतं. पण भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडमध्ये कमाल केली. हे अवघड लक्ष्य पार केलं.
भारताची प्लेइंग 11 : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), वैभव सूर्यवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नीतीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह और प्रिंस यादव.
न्यूजीलंडची प्लेइंग 11 : फिन एलन, टिम सीफर्ट (विकेटकीपर), डेरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेवन जैकब्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सेंटनर (कर्णधार), नाथन स्मिथ, जेकब डफी, मॅट हेनरी आणि लॉकी फर्ग्यूसन.