AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात ‘आदित्य ठाकरे’!

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी नावसाधर्म्य असलेला हा युवा क्रिकेटपटू आहे विदर्भाचा पोट्ट्या!

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात 'आदित्य ठाकरे'!
| Updated on: Aug 13, 2020 | 8:52 AM
Share

मुंबई : यंदाचे ‘आयपीएल’ यूएईमध्ये खेळवले जाणार असल्याची घोषणा झाल्यानंतर कोणता संघ फॉर्मात असणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. सर्वच टीम्स नेटाने सराव करत आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) संघात गोलंदाज आदित्य ठाकरे याची निवड करण्यात आली आहे. (Vidarbha Bowler Aditya Thakare gets selected for IPL Virat Kohli Team Royal Challengers Bangalore)

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी नावसाधर्म्य असलेला हा युवा क्रिकेटपटू आहे विदर्भाचा पोट्ट्या! ‘आयपीएल’साठी किती खेळाडू यूएईला न्यायचे, यावर बीसीसीआयने बंधन घातलेले आहे. पण यूएईमध्ये फलंदाजांना अधिकाधिक सरावासाठी विविधता असलेले गोलंदाज आवश्यक आहेत. ही गरज ओळखून ‘आरसीबी’ संघ व्यवस्थापनाने वेगवान गोलंदाज आदित्य ठाकरेची निवड केल्याची माहिती आहे.

आदित्य ठाकरे हा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चांगली गोलंदाजी करत आहे. 2018 मध्ये झालेल्या 18 वर्षांखालील युवा विश्वचषकातही आदित्यने दमदार कामगिरी केली आणि तो प्रकाशझोतात आला. आदित्यने स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याची वर्णी यावर्षी आरसीबीच्या चमूमध्ये लागल्याचे बोलले जाते.

फलंदाजांना सराव देण्यासाठीच आदित्यला आरसीबी संघाबरोबर यूएईला नेण्याचा निर्णय तूर्तास झाला आहे. मात्र नेट्समध्ये सराव करताना त्याची गोलंदाजी कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षकांना आवडली, तर त्याला मैदानात उतरण्याचा जॅकपॉटही लागू शकतो. आयपीएल खेळण्याचीही संधी मिळू शकते.

(Vidarbha Bowler Aditya Thakare gets selected for IPL Virat Kohli Team Royal Challengers Bangalore)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.