Virat Kohli : विराट कोहलीने आपल्या पहिल्या लिंक्डीन पोस्टमध्ये असं काय लिहिलंय? जे होतंय इतकं व्हायरल…..
क्रिकेटच्या मैदानावर आपल्या बॅटिंगने डरकाळी फोडणारा विराट कोहली चर्चेत आला आहे. याचं कारण म्हणजे लिक्डिंनवर त्याने केलेली पहिली पोस्ट. क्रिकेटमधील रिटायरमेटनंतर आता विराट कोहली 9 TO 5 नोकरी करणार करतोय की काय? अशा चर्चा चाहत्यांमध्ये सुरू झाल्या आहेत.

क्रिकेटच्या मैदानावर आपला जलवा दाखवणारा विराट कोहली आता लिंक्डिनवरही आपल्याला अॅक्टिव्ह राहणार आहे. याचं कारण काही साधसुदं नाही तर आता आपला विराट व्यवसायिक क्षेत्रातही आपले पहिले पाऊल टाकणार आहे. त्याचीच सुरूवात म्हणून विराटने ही पोस्ट केली आहे. म्हणजे आता विराट क्रिकेड सोडून ऑफिसमध्ये बसणार की काय?
पोस्टमध्ये विराटने सांगितलं आपलं मोठं स्वप्न
विराटने 13 ऑक्टोबरला लिंक्डीनवर पहिली पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्याने भारताला जागतिक क्रिडा क्षेत्रात मोठं स्थान मिळवून देण्याचं स्वप्न मांडलं. भारतात फक्त क्रिकेटच नाही तर प्रत्येक खेळाला महत्त्व मिळावं, लोकांनी प्रत्येक खेळाचा आनंद घ्यावा आणि देशातून जागतिक दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत. अशी त्याची इच्छा आहे.विराटने आपल्या पोस्टमध्ये भारतातूनच असे क्रिडा ब्रँड तयार करण्याचा विचार मांडला आहे जे जगभरात आपली ओळख निर्माण करतील.
चाहत्यांना वाटलं आता विराट क्रिकेट सोडून ऑफिसला जाणार
विराटची पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये कमालीच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. लिंक्डीन हे कॉर्पोरेट प्लॅटफॉर्म आहे. त्यावर विराटची अशी पोस्ट पाहून विराट आता कॉर्पोरेट जगात उतरणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर काहींनी क्रिकेटमधील रिटायरमेंट नंतर विराट आता 9 ते 5 नोकरी करणार का? अशा कमेंटसही केल्या आहेत.
विराटने त्याच्या पोस्टमध्ये व्यवसायाशी संबंधित कामांची आणि भविष्यातील योजनांची माहिती दिली आहे. तो Agilitas Sports मध्ये गुंतवणूकदार असून one8world या ब्रँडचा सहसंस्थापकही आहे. या गोष्टी विराटने लिक्डिंन या व्यावासायिक प्लॅटफॉर्मवर पोस्ट केल्या आहेत.
विराटचा प्लॅन फक्त क्रिकेटपूरता मर्यादित नाही
विराटने पोस्टच्या शेवटी भविष्यातही टिकून राहिल असं काहीतरी उभं करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याला भारतातून जागतिक स्तरावर पोहोचवणारा क्रिडा व्यवसाय उभा करायचा आहे. त्यामुळे त्याची ही पोस्ट म्हणजे किक्रेटच्या पलीकडे जाऊन व्यवसायात ऑफिशीअली पदार्पण केल्याची झलक आहे.
