
इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये वॉशिंग्टन सुंदरने आपल्या फलंदाजीने आणि गोलंदाजीने सर्वांच लक्ष वेधून घेतलय. टीम इंडियासाठी तो ऑलराऊंडर प्रदर्शन करतोय. त्याच्या खेळाबद्दल आपण नंतर बोलू. पण त्याआधी वॉशिंग्टन सुंदर एक हिंदू असूनही त्याचं जे नाव आहे, जे ऐकायला एकदम वेगळं वाटतं, त्या बद्दल बोलू. ऑलराऊंडर असलेल्या सुंदरला ते नाव का आणि कसं मिळालं?. त्याच्यामागे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे.
आम्ही बोलतोय त्याच्या वॉशिंग्टन नावाबद्दल. तो हिंदू आहे. मात्र, वॉशिंग्टन हे नाव ऐकायला थोडं विचित्र वाटतं. हे नाव थोडं ख्रिश्चन वाटतं. पण भारतीय ऑलराऊंडरला हे जे नाव मिळालय, त्यामागे इंटरेस्टिंग किस्सा आहे. असं नाव ठेवण्यामागे इतकी सुंदर गोष्ट कदाचितच असू शकते. वॉशिंग्टन या नावामागे खरी स्टोरी काय आहे, ते जाणून घ्या.
तू खेळ, मी तुला शिकविन असं तो निवृत्त अधिकारी म्हणाला
एम. सुंदर वॉशिंग्टन सुंदरचे वडील. त्यांना क्रिकेट खेळण्याची इच्छा होती. पण चांगलं क्रिकेट खेळूनही त्यांना तामिळनाडूच्या मुख्य संघात स्थान मिळालं नाही. लहान असताना ते स्टेडियममध्ये क्रिकेट खेळायला जायचे, त्यावेळी तिथे एक निवृत्त लष्करी अधिकारी यायचा. तो लहान मुलांना खेळताना पहायचा. त्यामध्ये एम. सुंदरही होते. एम सुंदरच्या खेळावर तो निवृत्त अधिकारी जास्त प्रभावित झाला. तू खेळ, मी तुला शिकविन असं तो निवृत्त अधिकारी म्हणाला. तुला किटबॅग देईन. सायकलवरुन शाळेत सोडायला आणि आणायला येईन. त्या निवृत्त अधिकाऱ्याने यासाठी हे सर्व केलं कारण एम. सुंदर एका गरीब कुटुंबातून यायचे. शिक्षण आणि क्रिकेटचा खर्च त्यांना झेपणारा नव्हता.
पुढे तो वॉशिंग्टन सुंदर म्हणून नावारुपाला आला
एम. सुंदर यांची मदत करणाऱ्या निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच नाव होतं, पी.डी. वॉशिंगटन. त्यांचं 1999 साली निधन झालं. 1999 साली एम. सुंदर यांच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्याच्या कानात जाऊन एम सुंदर बोलले श्रीनिवासन. थोड्यावेळाने त्यांना असं वाटलं की, या मुलाच नाव श्रीनिवास नको. ज्या माणसाने त्यांना आयुष्यात महत्त्वाच्या टप्प्यावर मदत केली, त्याच नाव द्यावं. म्हणून त्यांनी मुलाच नाव वॉशिंग्टन ठेवलं. पुढे तो वॉशिंग्टन सुंदर म्हणून नावारुपाला आला.