AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

57 शतकं, 19 हजार धावा, प्रथम श्रेणी क्रिकेटचा बादशाह वासिम जाफरचा क्रिकेटला अलविदा

रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा विक्रम रचणारा भारताचा तंत्रशुद्ध फलंदाज वासिम जाफरने  (Wasim Jaffar announces retirement) क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

57 शतकं, 19 हजार धावा, प्रथम श्रेणी क्रिकेटचा बादशाह वासिम जाफरचा क्रिकेटला अलविदा
Wasim Jaffer
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Mar 07, 2020 | 12:56 PM
Share

मुंबई : रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा विक्रम रचणारा भारताचा तंत्रशुद्ध फलंदाज वासिम जाफरने  (Wasim Jaffar announces retirement) क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भारतीय क्रिकेटमधील तांत्रिकदृष्ट्या सक्षम खेळाडूंपैकी एक असलेल्या वासिम जाफरने वयाच्या 42 व्या वर्षी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटला अलविदा केला. ‘माझ्या वडिलांची इच्छा होती की त्यांच्या मुलांपैकी एकाने भारताचे प्रतिनिधीत्व करावे आणि त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचा मला अभिमान आहे.’ असं वासिम जाफरने म्हटलं. (Wasim Jaffar announces retirement)

42 वर्षीय वासिम जाफर हा भारताचा अत्यंत तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळखला जातो. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जाफरने धावांचा रतीब घातला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने तब्बल 57 शतकं झळकावली आहेत.  260 प्रथम श्रेणी सामन्यात जाफरने तब्बल 19 हजार 410 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 57 शतकं आणि 91 अर्धशतकं ठोकली.  नाबाद 314 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे.

जाफर भारताकडून 31 कसोटी सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 1944 धावा केल्या आहेत. शिवाय दोन वन डे सामन्यातही जाफर भारताकडून खेळला आहे. वासिम जाफरने 2000 मध्ये आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केलं. शेवटची कसोटी तो 2008 मध्ये खेळला.

Batting and fielding averages (Source Cricinfo)
Mat Inns NO Runs HS Ave BF SR 100 50 4s 6s Ct St
Tests 31 58 1 1944 212 34.10 4045 48.05 5 11 272 3 27 0
ODIs 2 2 0 10 10 5.00 23 43.47 0 0 2 0 0 0
First-class 260 421 38 19410 314* 50.67 57 91 299 0
List A 118 117 7 4849 178* 44.08 10 33 45 0
T20s 23 23 1 616 95 28.00 477 129.14 0 6 75 11 11 0

दहा रणजी फायनल खेळाला, सर्व सामने जिंकले

गेल्या वर्षी विदर्भ संघाने रणजी चषकावर नाव कोरलं होतं. त्यावेळी वासिम जाफर विदर्भकडून खेळला होता. नागपुरात विदर्भ संघाने जिंकलेली ही रणजी ट्रॉफी वसिम जाफरच्या कारकीर्दीतली दहावी ट्रॉफी ठरली. 42 वर्षी वसिम जाफरचा हा दहावा रणजी अंतिम सामना होता आणि या सर्व सामन्यांमध्ये त्याला विजयाचा साक्षीदार होता आलं. त्याने 2015/16 पर्यंत मुंबईकडून खेळताना आठ वेळा रणजी चॅम्पियन होण्याचा मान मिळवला होता. तर गेल्या दोन मोसमांपासून तो विदर्भाकडून खेळतोय. विदर्भाने सलग दोनवेळा  विजय मिळवला.

वसिम जाफरने या विक्रमासोबत सर्वाधिक वेळा चॅम्पियन होण्याचा मनोहर हर्दिकर आणि दिलीप सरदेसाई यांचा विक्रमही मोडला. या दोन्ही दिग्गज खेळाडूंनीही प्रत्येकी 10 वेळा रणजी ट्रॉफी जिंकली होती. या यादीत वसिम जाफरच्या पुढे अजित वाडेकर (11) आणि अशोक मंकड (12) यांचा क्रमांक लागतो.

वासिम जाफरची शतकं

  • मुंबईकडून खेळताना – 36
  • पश्चिम विभागाकडून खेळताना – 7
  • विदर्भकडून खेळताना – 6
  • भारताकडून खेळताना – 5
  • इंडिया A -1

संबंधित बातम्या 

वासिम जाफर कोचच्या भूमिकेत, बांगलादेश क्रिकेट बोर्डाशी करार!  

वसिम जाफर, 10 रणजी फायनल खेळला, सर्वच्या सर्व जिंकला! 

40 व्या वर्षीही वासिम जाफर थकेना, 57 वं शतक झळकावलं!

Follow Us
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...