AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs SRH IPL 2021 Match Prediction: हैदराबादसमोर मुंबईचं आव्हान, वॉर्नरची ‘ऑरेंज आर्मी’ पहिला विजय मिळवणार?

आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Mumbai Indians vs Sunrisers Hydrabad ) आमनेसामने येत आहे. (Who will Win Mumbai Indians vs Sunrisers Hydrabad Match Stat 17 April In marathi)

MI vs SRH IPL 2021 Match Prediction:  हैदराबादसमोर मुंबईचं आव्हान, वॉर्नरची 'ऑरेंज आर्मी' पहिला विजय मिळवणार?
IPL 2021 MI vs SRH
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Apr 17, 2021 | 1:37 PM
Share

चेन्नई : आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Mumbai Indians vs Sunrisers Hydrabad ) आमनेसामने येत आहे. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर दोन्ही संघादरम्यान ही लढाई होणार आहे. या मोसमात सगळ्या संघांनी आतापर्यंत दोन दोन सामने खेळले आहेत. हैदराबाद वगळता सगळ्या संघांना विजयाची चव चाखण्यात यश आलंय. पहिल्या दोन सामन्यात थोड्या फार फरकाने हैदराबादला पराभव स्वीकारावा लागला आहे. केकेआरकडून 10 रन्सने हैदराबादला पराभूत व्हावं लागलं होतं तर बंगळुरुने हैदराबादला 06 रन्सने हरवलं होतं. आता आजच्या सामन्यात काहीही करुन पहिला विजय मिळवण्याचा हैदराबाद संघ प्रयत्न करेन. (Who will Win Mumbai Indians vs Sunrisers Hydrabad Match Stat 17 April In marathi)

मुंबईने खेळलेल्या 2 सामन्यांपैकी एका सामन्यात हार तर एका सामन्यात विजय मिळवला आहे. बंगळुरुविरुद्धची सलामीची लढत मुंबइने शेवटच्या बॉलवर गमावली. तर रोमांचक सामन्यात मुंबईने कोलकात्याला पराभवाची धूळ चारली. साहजिक कोलकात्याला नमवून विजयाची लय सापडलेला मुंबई संघ दुसऱ्या विजयाच्या आशाने मैदानात उतरेल.

आयपीएलमध्ये मुंबई vs हैदराबाद, कुणाचं पारडं जड?

मुंबई इंडियन्स विरुद्ध हैदराबाद यांच्यात आयपीएलच्या पीचवर एकूण 16 वेळा सामने झाले आहेत. त्यातील 8 सामने मुंबईने जिंकले आहेत तर 8 सामने हैदराबादने जिंकले आहेत. म्हणजेच दोघांचंही पारडं समसमान आहे. पाठीमागील मोसमातही पारडं समान राहिलं आहे. मागील मोसमात मुंबई हैदराबाद दोन वेळा आमने सामने आले. यातील पहिल्या सामन्यात मुंबईने 34 रन्सने विजय मिळवला तर दुसऱ्या सामन्यात हैदराबादने मुंबईला 10 विकेट्सने पराभूत केलं.

यंदा मुंबई वरचढ?

यंदाच्या मोसमात मुंबई हैदराबादवर वरचढ दिसत आहे तसंच टीमही बॅलन्स दिसत आहे. मुंबईने ज्याप्रकारे शेवटच्या सामन्यात कोलकात्याला हरवलंय त्यामुळे मुंबईचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. तर दुसरीकडे मोसमातील आपल्या पहिल्या विजयासाठी हैदराबादचा संघ संघर्ष करताना दिसून येईल.

दोन्ही संघात कोणते बदल होऊ शकतात?

आजच्या मुंबई विरुद्धच्या सामन्यात हैदराबाद संघात फलंदाजीमध्ये काही बदल दिसू शकतात. आजच्या मॅचमध्ये मनीष पांडे किंवा साहा यादोघांपैकी एकाचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबई संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे. परंतु जर काही बदल झालाच तर मार्को जेन्सनच्या ऐवजी नॅथन कुल्टर नाईलला संधी मिळू शकते.

(Who will Win Mumbai Indians vs Sunrisers Hydrabad Match Stat 17 April In marathi)

हे ही वाचा :

IPL 2021 MI vs SRH : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, सामना कधी, कुठे, केव्हा?

IPL 2021 : ‘धोनीला म्हातारपणाची जाणीव’, 200 सामने पूर्ण करताच मोठं वक्तव्य, पाहा व्हिडीओ…

IPL 2021 : चेन्नईविरुद्धची मॅच गमावल्यानंतर के एल राहुलला दु:ख, म्हणतो, ‘माझ्याजवळ बोलायला…’

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!