Video : इरफान पठाण, सुरेश रैनाने गायलं गाण, ‘सुर बने हमारा तुम्हारा की बिघडा’पाहा

भारतीय संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाण हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरती शेअर केला आहे.

Video : इरफान पठाण, सुरेश रैनाने गायलं गाण, सुर बने हमारा तुम्हारा की बिघडापाहा
इरफान पठाण, सुरेश रैनाने गायलं गाण, 'सुर बने हमारा तुम्हारा की बिघडा'पाहा
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Sep 13, 2022 | 1:30 PM

इंडीया टीम (Team India) मधील अनेक खेळाडू वेगवेगळ्या गोष्टींमुळे व्हायरल झाले आहेत. त्यापैकी अनेकांचे व्हिडीओ सोशल मीडीयावर (Social Media) व्हायरल सुद्धा झाले आहेत. इंडीया टीममधील माजी क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan)आणि सुरेश रैना (Suresh Raina) सध्या रोड सेफ्टी या मालिकेत खेळत आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही खेळाडू इंडिया लिजेंड्सचे सदस्य आहेत. सचिन तेंडुलकर, मुनाफ पटेल आणि युवराज सिंग यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडू इंडिया लिजेंड्सचे सदस्य आहेत. विशेष म्हणजे सध्या इरफान पठाण, सुरेश रैनाने एक गाणं गायल आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.

भारतीय संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाण हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरती शेअर केला आहे. तो व्हिडीओ चाहत्यांना अधिक आवडला आहे. तसेच त्यावर चाहत्यांनी अनेक कमेंट सुद्धा केल्या आहेत. ‘एहसान तेरा होगा मुझपर’ हे गाणं इरफान पठाण, सुरेश रैनाने गायलं आहे.

उद्या इंडिया लिजेंड्सची वेस्टइंडिज लिजेंड्ससोबत मॅच आहे. ही मॅच कानपूरमध्ये होणार आहे. त्यामुळे सगळे खेळाडू कानपूरमध्ये थांबले आहेत. तिथल्या हॉटेलमध्ये अनेक खेळाडू मस्ती करीत असलेले व्हीडिओ व्हायरल झाले आहेत. त्यावर वसिम जाफर या भारतीय खेळाडूने कमेंट केली आहे, की ‘अभिनंदन, तुम्ही मुंबईला येऊ शकता.’