कॉल ड्रॉप भोवलं, टेलिकॉम कंपन्यांना तब्बल 58 लाखांचा दंड, आयडीयाला सर्वाधिक भुर्दंड

मुंबई : कॉल ड्रॉप प्रकरणावर दुरसंचार मंत्रालयाने आक्रमक असं पाऊल उचलत सिम कार्ड कंपन्यावर कारवाई केली आहे. कॉल ड्रॉप नियंत्रणात आणण्यासाठी हे कठोर पाऊल उचलण्यात आलं असल्याचं शुक्रावरी दुरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितलं. बीएसएनएल (BSNL), आयडिया (Idea) सह विभिन्न सर्व्हिस प्रोव्हायडर्सवर तब्बल 58 लाख रुपयांची पेनल्टी लावण्यात आली आहे. कॉल ड्रॉप संदर्भात नियमांचे पालन …

कॉल ड्रॉप भोवलं, टेलिकॉम कंपन्यांना तब्बल 58 लाखांचा दंड, आयडीयाला सर्वाधिक भुर्दंड

मुंबई : कॉल ड्रॉप प्रकरणावर दुरसंचार मंत्रालयाने आक्रमक असं पाऊल उचलत सिम कार्ड कंपन्यावर कारवाई केली आहे. कॉल ड्रॉप नियंत्रणात आणण्यासाठी हे कठोर पाऊल उचलण्यात आलं असल्याचं शुक्रावरी दुरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितलं. बीएसएनएल (BSNL), आयडिया (Idea) सह विभिन्न सर्व्हिस प्रोव्हायडर्सवर तब्बल 58 लाख रुपयांची पेनल्टी लावण्यात आली आहे.

कॉल ड्रॉप संदर्भात नियमांचे पालन न करणाऱ्या कंपन्यावर जून 2018 मध्ये BSNL वर चार लाख रुपये पेनल्टी लावण्यात आली होती. तर याच दरम्यान आयडीयावर 12 लाख रुपयांची पेनल्टी लावली होती. मार्च 2018 मध्ये बीएसएनएल, आयडिया, टाटा आणि टेलीनॉरवर पेनल्टी लावण्यात आली होती. असं मनोज सिन्हा म्हणाले.

सर्व्हिस प्रोव्हायडर्सवर ही पेनल्टी भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण (TRAI)ने लावली आहे. या संबधित नेहमी सिम कार्ड कंपन्यावर लक्ष ठेवले जाते. तर काही ठिकाणी रेडिएशनच्या भितीने लोक मोबाईल टॉवरला विरोध करतात. यामुळेही मुलभूत ढाचा विकसीत करण्यात अडथळे येतात असं मनोज सिन्हा म्हणाले.

दुरसंचार विभागाच्या कारवाईमुळे सध्या सर्व्हिस प्रोव्हायडर्सचे धाबे दणाणले आहेत. एकूण  58 लाखांच्या पेनल्टी सिम कार्ड कंपन्यावर लावल्यामुळे दुरसंचार विभागाची ही मोठी कारवाई असल्याचे बोललं जात आहे. यामध्ये सर्वात जास्त भुर्दंड आयडियाला बसला आहे. एकट्या आयडियाला तब्बल 12 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *