मायक्रोसॉफ्टच्या 80 कोटी युजर्सवर हॅकिंगचं संकट

मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनीने सर्व संगणक युजर्ससाठी एक धक्कादायक अशी माहिती दिली आहे. जगभरात 80 कोटी मायक्रोसॉफ्ट युजर्सवर हॅकिंगचं संकट असल्याची शक्यता कंपनीने वर्तवली आहे.

मायक्रोसॉफ्टच्या 80 कोटी युजर्सवर हॅकिंगचं संकट

मुंबई : मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनीने सर्व संगणक युजर्ससाठी एक धक्कादायक अशी माहिती दिली आहे. जगभरात 80 कोटी मायक्रोसॉफ्ट युजर्सवर हॅकिंगचं संकट असल्याची शक्यता कंपनीने वर्तवली आहे. जगभरातील 80 कोटी युजर्स विंडोज 10 चा वापर करतात. त्यामुळे सर्व मायक्रोसॉफ्ट (Microsoft) युजर्समध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

विंडोज 10 सिस्टममधून रिमोट कोड एक्झिक्यूशन (RCE) नावाने दोन बग (Bug) सापडले आहेत. यामाध्यमातून मालवेअरला एका सिस्टममधून दुसऱ्या सिस्टमपर्यंत ऑटोमॅटिकली ट्रान्सफर केले जाऊ शकते. सध्या हा बग हटवण्यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे, असं मायक्रोसॉफ्ट सिक्युरिटी सेंटरने सांगितले.

बगमुळे विंडोज 10 व्हर्जन असेलेल संगणकाच्या सिक्युरिटीला धोका निर्माण झाला आहे. याशिवाय विंडोज 7 SP1, विंडोज सर्व्हर 2008 R2 SP1, विंडोज सर्व्हर 2012, विंडोज 8.1 आणि विंडोज सर्व्हर 2012 R2 यांच्या सिक्युरिटीलाही धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती मायक्रोसॉफ्ट कंपनींच्या एका अधिकाऱ्याने दिली.

अशा प्रकारे हॅकर्स संगणाकवर हल्ला करु शकतात

हॅकर्स बगचा फायदा घेऊन तुमचे सिस्टम हॅक करु शकतात. ते तुमचा डेटा डिलीट करु शकतात. ते त्यांच्या पद्धतीने अॅपमध्ये मालवेअर इन्स्टॉल करु शकतात. हा बग हटवण्यासाठी लवकरच नवीन अपडेट लाँच केले जाईल, असं फोर्ब्सच्या रिपोर्टमध्ये मायक्रोसॉफ्टच्या संरक्षण सल्लागार अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *