तुमच्या आवाजाने चालू होणार 'ही' कार

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेलच्या किंमती पाहिल्या तर सध्या अनेक कंपन्या इलेक्ट्रॉनिक कार लाँच करत आहेत. मात्र यासोबत या कारमध्ये लग्जरी सुविधा आणि आकर्षक अशी डिझाईन दिली जाते. तसेच कोणतेही प्रोडक्ट प्रसिद्ध होण्यामागे त्याच्या किंमतीची भूमिका महत्त्वाची असते. अशीच एक इलेक्ट्रॉनिक कार सध्या चीनमधील Great wall motors यांनी एक इलेक्ट्रॉनिक कार लाँच केली आहे. …

electronic car, तुमच्या आवाजाने चालू होणार ‘ही’ कार

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेलच्या किंमती पाहिल्या तर सध्या अनेक कंपन्या इलेक्ट्रॉनिक कार लाँच करत आहेत. मात्र यासोबत या कारमध्ये लग्जरी सुविधा आणि आकर्षक अशी डिझाईन दिली जाते. तसेच कोणतेही प्रोडक्ट प्रसिद्ध होण्यामागे त्याच्या किंमतीची भूमिका महत्त्वाची असते.

electronic car, तुमच्या आवाजाने चालू होणार ‘ही’ कार

अशीच एक इलेक्ट्रॉनिक कार सध्या चीनमधील Great wall motors यांनी एक इलेक्ट्रॉनिक कार लाँच केली आहे. Ora R1 असं या कारचं नाव आहे. तसेच या इलेक्ट्रॉनिक कारची किंमत 8680 डॉलर म्हणजे भारतीय रुपयात 6.05 लाख रुपये आहे.

electronic car, तुमच्या आवाजाने चालू होणार ‘ही’ कार

या इलेक्ट्रॉनिक कारमध्ये टेस्ला ऑटोपायलट किंवा त्याच्या सारखी काही इतर फॅन्सी टेक्नॉलॉजी फीचर्स नाहीत. मात्र लुकमध्ये ही कार आकर्षक आहे. कारच्या स्टीलवर शानदार कर्व्ह आणि मोठे राऊंड हेड लॅम्प दिले आहेत.

electronic car, तुमच्या आवाजाने चालू होणार ‘ही’ कार

‘ओरा आर1’  इलेक्ट्रॉनिक कारमध्ये 35-kWh ची बॅटरी दिली आहे. एकदा कारची चार्जिगं पूर्ण झाली तर 312 किलोमीटरपर्यंत ती पळू शकते, असा दावा कंपनीने केला आहे.

electronic car, तुमच्या आवाजाने चालू होणार ‘ही’ कार

या इलेक्ट्रॉनिक कारमध्ये आर्टीफिशियल इंटेलिजेन्स सिस्टम दिला आहे. ज्यामध्ये ‘Hello Ora’ असे बोलल्यावर ही कार चालू होते. सध्या ही कार चिनच्या बाजारात उपलब्ध आहे. मात्र इलेक्ट्रॉनिक कारच्या बाबतीत सरकारकडूनही या कार वापरण्यासाठी सांगितले जाते, यामुळे काही वर्षात या कार भारतीय बाजारपेठेत ही उपलब्ध होतील.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *