रिअलमी 3 प्रोमध्ये मिळणार 64 मेगापिक्सल कॅमेरा

रिअलमी 3 प्रोमध्ये मिळणार 64 मेगापिक्सल कॅमेरा

मुंबई : भारतात लवकरच 64 मेगापिक्सल असेलेला कॅमेरा फोन लाँच होत आहे. हा स्मार्टफोन रिअलमी कंपनीचा असणार आहे. येत्या 22 एप्रिलला Realme 3 Pro स्मार्टफोन लाँच होणार आहे. कंपनीने आपल्या प्रत्येक फोनमध्ये ग्राहकांना काहितरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला. यावेळी कंपनीने कॅमेऱ्यावर विशेष लक्ष दिलं आहे. Realme 3 प्रोमध्ये तब्बल 64 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

सीईओ माधव सेठ यांनी ट्वीट करत म्हटंल आहे की, “Realme 3 प्रोमध्ये एक अल्ट्रा-HD मोडचा सपोर्ट दिला आहे. या फीचरच्या माध्यमातून 64MP फोटो क्लिक करु शकतो. तसेच 22 एप्रिलला 64 मेगापिक्सल कॅमेऱ्याचे कामही दाखवले जाणार आहे.”

Realme 3 प्रो फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसरसोबत 6GB रॅम दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच यामध्ये Fortnite चा सपोर्ट असेल. रिअल मी 3 प्रोच्या कॅमेऱ्यामुळे सर्वजण या स्मार्टफोनकडे आकर्षित होण्याची शक्यता आहे.

या फोनमध्ये स्लो मोशन आणि फास्ट चार्जिंगचेही फीचर दिले आहे. या फीचरची माहिती आधीच माधव सेठ यांनी दिली होती. याशिवाय वन प्लस 6टी सारखे नाईटस्केप सीन फीचरप्रमाणे नाईट मोड फीचर रिअल मी 3 प्रोमध्ये देण्यात आलं आहे. या फोनची किंमत अंदाजे 15 ते 20 हजार रुपये असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI