boAt ने भारतात लाँच केले 8 नवीन स्पीकर्स, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
boAt ने भारतात PartyPal स्पीकर सिरीज अंतर्गत आठ नवीन पार्टी स्पीकर्स लाँच केले आहेत. या नवीन सिरीजमध्ये वायरलेस मायक्रोफोन आणि कराओके प्रो-ट्यूनर यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. चला तर मग या सर्व नवीन स्पीकर्समध्ये काय खास आहे ते त्यांची किंमत फिचर्स जाणून घेऊयात.

बोटने पार्टीपाल स्पीकर सिरीज सादर करून भारतातील त्यांच्या ऑडिओ पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. कंपनीने या लाइनअपमध्ये पार्टीपाल 650, पार्टीपाल 600 प्लस, पार्टीपाल 500, पार्टीपाल 390 प्लस, पार्टीपाल 230, पार्टीपाल बूम, पार्टीपाल अल्ट्रा आणि पार्टीपाल रंबल असे आठ नवीन स्पीकर्स सादर केले आहेत. हे स्पीकर्स विशेषतः संगीत, पार्ट्या आणि कराओके यांसारख्या घरगुती वापरासाठी डिझाइन केलेले आहेत. या सिरीजमध्ये आरजीबी लायटिंग, डीजे कंट्रोल्स आणि वायरलेस मायक्रोफोन यांसारखी वैशिष्ट्ये देखील उपलब्ध आहेत. तर या खास स्पीकर्सच्या किंमती आजच्या लेखात जाणून घेऊयात.
बोट पार्टीपाल सिरीजची भारतातील किंमत
बोट पार्टीपाल सिरीजची किंमत 9 हजार 499 रूपये ते 24 हजार 999 रूपयांपर्यंत आहे. ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवरून, ॲमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट आणि देशभरातील निवडक ऑफलाइन रिटेल स्टोअर्समधून ही खरेदी करू शकतात.
कंपनीने वेगवेगळ्या गरजा आणि बजेटनुसार या सिरीजमध्ये अनेक मॉडेल्स सादर केले आहेत, जेणेकरून वापरकर्ते लहान घरगुती कार्यक्रमांपासून ते मोठ्या पार्ट्यांपर्यंत आपल्या आवडीनुसार स्पीकर खरेदी करू शकतील.
या स्पीकरमध्ये कराओकेसाठी विशेष सुविधा
पार्टीपाल सिरीजच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे कराओके प्रो-ट्यूनर. हे एक ऑटो-ट्यूनिंग फीचर आहे, जे कराओके दरम्यान आवाजाला रिअल-टाइममध्ये ॲडजस्ट करतो. यामुळे वापरकर्त्यांना गाताना अधिक चांगला आवाज मिळेल अशी अपेक्षा आहे.
या स्पीकर्समध्ये डीजे कंट्रोल्सची सोय देखील आहे. यामध्ये आरजीबी लायटिंगची सुविधा आहे, जी गाण्याच्या तालावर वेगवेगळे लाईट्सचे प्रभाव दाखवते. मॉडेलनुसार वायरलेस आणि वायर्ड मायक्रोफोन्स, तसेच गिटार जोडण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.
पार्टीपॅल 650 हे सर्वात पॉवरफूल मॉडेल
पार्टीपॅल 650 हे या मालिकेतील प्रमुख मॉडेल असून यात 300 वॅट ऑडिओ आउटपुट मिळतो. सोबत दोन UHF वायरलेस मायक्रोफोन, DJ ट्रॅक आणि बास ड्रॉप पॅड दिले आहेत. त्यामुळे गाण्यांमध्ये विविध साउंड इफेक्ट्स जोडता येतात.
पार्टीपॅल 650 मध्ये Bluetooth 5.3, TWS, AUX, USB आणि TF कार्डचा सपोर्ट आहे. यात वायर्ड माइक जोडता येतो आणि बॅटरी 5 तासांपर्यंत चालते. स्पीकरला चाकेही आहेत ज्यामुळे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवणे सोपे होते.
boAt Hearables अॅपद्वारे ऑडिओ सेटिंग्ज आणि RGB लाइटिंग कस्टमाइझ करता येते. कराओके, DJ इफेक्ट्स आणि पार्टी लाइटिंगमुळे हा स्पीकर पार्टीसाठी ऑल-इन-वन पर्याय ठरतो.