भारतात बोटने लाँच केला नवीन Smartwatch आणि Headphones, हे आहेत खास फिचर्स

बोटने सेलर नॅव्ह स्मार्टवॉच आणि सेलर प्ले हेडफोन्स सादर केले आहेत. या स्मार्टवॉचमध्ये गूगल मॅप्स ट्रॅकिंग, 4G कॉलिंग आणि SOS अलर्ट्स यांसारखी फिचर्स आहेत. चला तर मग आजच्या लेखात याची किंमत जाणून घेऊयात.

भारतात बोटने लाँच केला नवीन Smartwatch आणि Headphones, हे आहेत खास फिचर्स
boat smartwatch
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Jul 30, 2026 | 4:54 PM

बोटने भारतात मुलांसाठी नवीन सेलर नॅव्ह स्मार्टवॉच सादर केले आहे. या स्मार्टवॉचमध्ये गूगल मॅप्सद्वारे रिअल-टाइम लोकेशन ट्रॅकिंग, 4G व्हिडिओ आणि व्हॉइस कॉलिंग, SOS अलर्ट्स आणि जिओ-फेन्सिंगची फिचर्स आहेत. त्यासोबतच काही गरजा लक्षात घेता कंपनीने मुलांसाठी सेलर प्ले वायरलेस हेडफोन्स देखील भारतीय बाजारात सादर केले आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की ही दोन्ही डिव्हाइस मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या गरजा लक्षात घेऊन विकसित करण्यात आली आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण या दोन्ही डिव्हाईसची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

बोट सेलर नॅव्ह स्मार्टवॉच आणि सेलर प्ले वायरलेस हेडफोन्स यांच्‍या किंमती

बोट सेलर नॅव्हची किंमत 6 हजार 499 रूपये असून ते फेअरी पिंक आणि स्काय ब्लू रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर यासोबतच लाँच केलेल्या सेलर प्ले वायरलेस हेडफोन्सची किंमत 1 हजार 499 रूपये असून ते बबलगम पिंक, शार्क ब्लू आणि कोरल ब्लू रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

सेलर नॅव्ह स्मार्टफोनमध्ये गुगल मॅप्स ट्रॅकिंग आणि 4जी कॉलिंग

बोट सेलर नॅव्हमध्ये गूगल मॅप्सद्वारे रिअल-टाइम लोकेशन ट्रॅकिंगची सुविधा आहे, ज्यामुळे पालक आपल्या मुलाच्या लोकेशनवर लांबूनही लक्ष देऊ शकता. यात जिओ-फेन्सिंग आणि 5-पॉइंट सॅटेलाइट पोझिशनिंगलाही सपोर्ट आहे. तसेच पालकवर्ग मुलांच्या सेफ्टीकरिता शाळा किंवा घरासारखी ठिकाणीही याचा वापर करू शकतात. जेव्हा मूल तुम्ही सेट केलेल्या ठिकाणी येताच किंवा बाहेर पडता, तेव्हा हे स्मार्टवॉच त्वरित अलर्ट पाठवते. तसेच यात असलेल्या 4G सिमद्वारे टू-वे व्हिडिओ आणि व्हॉइस कॉलिंगलाही सपोर्ट आहे.

मुलांसाठी एसओएस सुविधा आणि कम्‍युनिकेशन

बोट सेलर नॅव्हमध्ये 1.4-इंचाचा एचडी डिस्प्ले आहे, ज्यामुळे व्हिडिओ कॉल्स, मेसेजिंग आणि इतर कंट्रोल वापरण्यास सोपी होतात. यात ऑडिओ चॅटची सुविधा देखील आहे, ज्यामुळे सेलर नॅव्ह वापरणारी मुले एकमेकांना व्हॉइस मेसेज पाठवू शकतात. आपत्कालीन परिस्थितीत मुले मदतीसाठी त्वरित सूचना पाठवण्यासाठी स्मार्टवॉचवरील खास एसओएस (SOS) बटणाचा वापर करू शकतात.

सेलर प्ले हेडफोन्सची वैशिष्ट्ये

या हेडफोन्समध्ये 40 मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्स, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. तसेच बिल्ट इन मायक्रोफोन आणि मल्टी-फंक्शन कंट्रोल्स आहेत. मुलांच्या ऐकण्याचा क्षमता लक्षात घेऊन या हेडफोन्समध्ये कमाल आवाज 85 डेसिबलपर्यंत मर्यादित ठेवण्यात आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us