गुगल पिक्सल 11 सिरीज ‘या’ आठवड्यात भारतात होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत
पिक्सेल 11 सिरीजला अनेक मोठे अपग्रेड मिळणार आहेत. लाँचपूर्वी लीक झालेल्या माहितीनुसार हा फोन या आठवड्यात भारतात सादर होणार आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण गुगल पिक्सल 11 सिरीजची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.
गुगलच्या नवीन पिक्सेल 11 सिरीजची प्रतीक्षा आता संपणार आहे. ताज्या माहितीनुसार गुगल पिक्सेल 11 सिरीज या आठवड्यात भारतात दाखल होऊ शकते. गुगल पिक्सेल 11 सिरीजसाठीचा ‘मेड बाय गुगल’ लाँच इव्हेंट 12 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे. भारतात, हा इव्हेंट 13 ऑगस्ट रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 3 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास सुरू होईल. या सिरीजमध्ये पिक्सेल 11, पिक्सेल 11 प्रो, पिक्सेल 11 प्रो एक्सएल आणि पिक्सेल 11 प्रो फोल्ड यांसारख्या मॉडेल्सचा समावेश असण्याची शक्यता आहे. लाँच होण्यापूर्वी फोनच्या किंमतीपासून ते प्रोसेसर, कॅमेरा, बॅटरी आणि डिस्प्लेपर्यंत अनेक महत्त्वाचे तपशील लीक झाली आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात.
पिक्सेल 11 मध्ये असणार नवीन टेन्सर जी6 चिपसेट
लीक झालेल्या माहितीनुसार गूगल पिक्सल 11 मध्ये कंपनीचा नवीन टेन्सर जी6 चिपसेट असू शकतो. हा फोन 12जीबी आणि 16जीबी रॅममध्ये येण्याची शक्यता आहे, तर स्टोरेजचे पर्याय 256जीबी आणि 512जीबी असतील. पिक्सल 11 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा 6.3-इंचाचा ॲक्टुआ ओएलईडी डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. तसेच या फोनमध्ये टायटन एम3 सिक्युरिटी को-प्रोसेसर देखील असल्याचे म्हटले जाते.
कॅमेरा आणि बॅटरीमध्येही मोठे अपग्रेड
कॅमेरा सेटअपच्या बाबतीत पिक्सेल 11 मध्ये 48MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 13MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा असण्याची शक्यता आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 10.5MP चा फ्रंट कॅमेरा अपेक्षित आहे. या फोनमध्ये 4,985mAh क्षमतेची बॅटरी असून, ती 30W वायर्ड चार्जिंग आणि Qi2 वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते, असे लीक झालेल्या माहितीत सांगण्यात आले आहे. याव्यतिरिक्त हा फोन अँड्रॉइड 17 वर चालेल आणि त्यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असण्याची शक्यता आहे.
पिक्सेल 11 प्रो पासून फोल्ड पर्यंत किती खर्च येईल?
लीक्सनुसार पिक्सेल 11 ची किंमत सुमारे 899 डॉलर, म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे 85 हजार 500 रूपयांपासून सुरू होऊ शकतो. पिक्सेल 11 प्रो ची किंमत सुमारे 1,099 डॉलर अंदाजे 1 लाख 05 हजार असेल. तर पिक्सेल 11 प्रो एक्सएल ची किंमत 1,299 डॉलर अंदाजे 1.लाख 24 हजार असण्याची शक्यता आहे. पिक्सेल 11 प्रो फोल्ड ची किंमत सुमारे 1,899 डॉलर आहे, अंदाजे रु. 1 लाख 81 हजार असण्याची शक्यता आहे. तथापि या किमती लीक्सवर आधारित आहेत आणि अधिकृत किंमत लाँचच्या वेळी उपलब्ध होईल.
लाँच करण्यापूर्वी जाणून घेण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी
पिक्सेल 11 सिरीजबद्दल समोर आलेली सर्व माहिती सध्या लीक्स आणि रिपोर्ट्सवर आधारित आहे. या सिरीजमध्ये पिक्सेल 11, पिक्सेल 11 प्रो, पिक्सेल 11 प्रो एक्सएल आणि पिक्सेल 11 प्रो फोल्ड यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. यामध्ये नवीन चिपसेट, हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले, सुधारित कॅमेरा आणि मोठी बॅटरी यांसारखे अपग्रेड्स असण्याची अपेक्षा आहे. तथापि, गुगलने किंमत, फीचर्स आणि लाँचच्या तपशिलांची अधिकृतपणे पुष्टी केल्यावरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.