AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio Recharge : जिओच्या ग्राहकांची चिंताच मिटली! दररोज 3GB डेटा, Netflix अन् हॉटस्टार फ्री

Jio Recharge News : वारंवार मोबाईल रिचार्ज करण्याच्या त्रासाला तुम्ही कंटाळला असाल आणि तुम्हाला वेगवान इंटरनेटसोबतच शानदार OTT प्लॅटफॉर्मचा आनंद घ्यायचा असेल, तर जिओने एक खास प्लॅन आणला आहे.

Jio Recharge : जिओच्या ग्राहकांची चिंताच मिटली! दररोज 3GB डेटा, Netflix अन् हॉटस्टार फ्री
Jio recharge plan for 84 DaysImage Credit source: Google
| Updated on: Sep 02, 2026 | 9:52 PM
Share

जिओच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वारंवार मोबाईल रिचार्ज करण्याच्या त्रासाला तुम्ही कंटाळला असाल आणि तुम्हाला वेगवान इंटरनेटसोबतच शानदार OTT प्लॅटफॉर्मचा आनंद घ्यायचा असेल, तर जिओने एक खास प्लॅन आणला आहे. टेलिकॉम बाजारात लोकप्रिय असलेला जिओचा 1,799 रुपयांचा प्रीपेड प्लॅन संपूर्ण एंटरटेनमेंट आणि टेक पॅकेज म्हणून ओळखले जाते. या पॅकबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

84 दिवस अनलिमिटेड कॉलिंग आणि भरपूर डेटा

जिओच्या 1,799 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना तब्बल 84 दिवसांची वैधता मिळते. या कालावधीत दररोज 3GB हाय-स्पीड इंटरनेट डेटा दिला जातो. म्हणजेच 84 दिवसांत एकूण 252GB डेटा मिळतो. एखाद्या दिवशी तुमचा डेली डेटा कोटा संपला तरी इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद होणार नाही, तर 64 Kbps वेगाने सुरू राहील. विशेष म्हणजे, 5G नेटवर्क उपलब्ध असलेल्या भागात पात्र ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटाचाही लाभ मिळतो. याशिवाय देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS पाठवण्याची सुविधा मोफत मिळते.

Netflix आणि JioHotstar मोफत

या प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये मिळणारे मनोरंजनाचे फायदे. हा रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना 84 दिवसांसाठी Netflix बेसिकचे मोफत सब्सक्रिप्शन मिळते. यासोबतच हॉलीवूड चित्रपट आणि वेब सीरिज पाहणाऱ्या ग्राहकांसाठी रिओ हॉटस्टार मोबाईल + Hollywood चे सब्सक्रिप्शनही दिले जाते. लाइव्ह टीव्ही पाहण्याची आवड असलेल्या ग्राहकांना JioTV चा आनंदही कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय घेता येतो.

35 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे गुगल जेमिनी सब्सक्रिप्शन

मनोरंजनासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीतही हा प्लॅन आकर्षक आहे. या रिचार्जसोबत कंपनीकडून तब्बल 18 महिन्यांचा गुगल जेमिनी प्रो प्लान मोफत दिला जात आहे. या प्रीमियम AI टूलची बाजारातील किंमत सुमारे 35,100 रुपये असल्याचे सांगितले जाते. यामध्ये ग्राहकांना तब्बल 5,000GB क्लाउड स्टोरेज आणि नॅनो बनाना सारख्या फीचर्सचा लाभ मिळतो. तसेच महत्त्वाच्या फाइल्स आणि फोटो सुरक्षित ठेवण्यासाठी JioAICloud चे 50GB मोफत स्टोरेजही या पॅकेजमध्ये समाविष्ट आहे.

एकूणच, 84 दिवसांची दीर्घ वैधता, दररोज 3GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, OTT सब्सक्रिप्शन आणि Google Gemini सारख्या AI सेवेचा लाभ एकाच प्लॅनमध्ये मिळत असल्याने 1,799 रुपयांचा हा जिओ रिचार्ज प्लॅन ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतो.

Follow Us
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
Shivsena Hearing : सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28 वा मुद्दा सर्वात खास
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि... गुणरत्न सदावर्तेंची पत्रकार परिषद ऐकाच!
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर... सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर सुळे संतापल्या
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार अन्...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा खुलासा; कुटुंबाकडून हादरवणारी माहिती समोर
महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
बुलढाण्यात राजकीय वाद विकोपाला; महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच...
चालता येईना... जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच आला समोर
कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
बाळासाहेब म्हणाले होते, माझ्या पक्षाची काँग्रेस... कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला: अमित ठाकरेंच्या निषेधार्थ सभा तहकूब
नंबर प्लेटबाबत विचारताच आमदाराची अरेरावी, चक्क शिवगाळ करत...खळबळजनक...
नंबर प्लेटबाबत विचारताच आमदाराची अरेरावी, चक्क शिवगाळ करत... खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल!