AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio Ai Glasses : आता चष्यामधून करता येणार UPI पेमेंट, Jio चे Ai स्मार्ट ग्लासेस चर्चेत,लाईव्ह ट्रान्सलेशनसह मिळणार खास फिचर्स

रिलायन्स जिओने इंडिया मोबाईल काँग्रेस २०२६ मध्ये AI स्मार्ट चष्म्यांची झलक दाखवली.QR कोड स्कॅन करून UPI पेमेंट, व्हॉइस असिस्टंट आणि लाइव्ह ट्रान्सलेशनसारख्या यांसारख्या गोष्टी आता चष्म्याच्या माध्यमातून करता येेणे शक्य होणार आहे. लवकरच हे प्रोडक्ट मार्केटमध्ये लाँच होणार आहे.

Jio Ai Glasses  : आता चष्यामधून करता येणार UPI पेमेंट, Jio चे Ai स्मार्ट ग्लासेस चर्चेत,लाईव्ह ट्रान्सलेशनसह मिळणार खास फिचर्स
jio ai glassesImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 12, 2026 | 3:00 PM
Share

आतापर्यंत दुकानात गेल्यावर UPI पेमेंट करण्यासाठी मोबाईल काढावा लागत होता.क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करावे लागत होते. आतापर्यंत ही टेक्नोलॉजी आपल्याला अॅडवान्स वाटत होती. पण आता त्याहीपेक्षा Jio ने एक पाऊल पुढे टाकलंय. रिलायन्स जिओने असे काही चष्मे सादर केले आहेत. ज्यांच्या मदतीने आता पेमेंट करणे शक्य होणार आहे. एवढंच नाही तर Ai च्या मदतीने लोकांशी वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलणे सहज शक्य होणार आहे.

Jio कसे असणार आहेत हे Jio चे स्मार्ट चष्मे

रियायन्स जिओने इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये 2026 मध्ये आपल्या ai स्मार्ट चष्म्यांची झलक दाखवली. त्याच चष्म्यांचे दोन प्रकार त्यांनी सादर केले. एका चष्म्यांत कॅमेरा नसून गाणी ऐकण्यासाठी स्पीकर असतील. तर दुसर्‍या प्रकारात स्पीकर सोबतच कॅमेराही दिला जाणार आहे. हे चष्मे जरी दिसायला सामान्य चष्म्यांसारखे असले तरी त्यामध्ये ai टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे आता गाणी ऐकणे, फोन करणे, व्हिडिओ रेकॉर्ड करणे त्यासोबतच पेमेंट करणेही शक्य होणार आहे.

चष्म्यांतून UPI पेमेंट

jio च्या चष्म्यांतील सर्वात मोठं वैशिष्ठ्य म्हणजे चष्म्यांतून केले जाणारे पेमेंट. या चष्म्याच्या कॅमेऱ्याच्या मदतीने दुकानातील QR CODE स्कॅन करता येणार आहे. मग कमांड दिल्यावर पेमेंट करणेही शक्य होणार आहे.मात्र पेमेंट करताना ऑथेंटिकेशन प्रोसेस, सिक्युरीटी सिस्टिम आणि ट्रांजेक्शन लिमिट याबाबत कोणतीही माहिती अद्याप शेअर केली गेली नाही आहे. पण भारतीय बाजारात हे पाऊल मोठे आणि महत्त्वाचे मानले जात आहे.

वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या लोकांशी बोलता येणे होणार सोपे

या स्मार्ट चष्म्यांमध्ये लाईव्ह ट्रान्सलेशनची सुविधाही असणार आहे. त्यामुळे दोन वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांना एकमेंकाचं बोलणं समजून घेण्यास मदत होणार आहे.याशिवाय अनेक भारतीय भाषांचा आधार आणि AI व्हॉईस असिस्टंटही मिळण्याची शक्यता आहे.

किंमत किती आणि बाजारात केव्हा येणार?

जिओने या स्मार्ट चष्म्यांची अधिकृत किंमत, बॅटरीची क्षमता आणि संपूर्ण माहिती अद्याप जाहीर केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार हे चष्मे नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2026 पर्यंत होण्याची शक्यता आहे.

Follow Us
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?