कमी बजेट, भारी लॅपटॉप! स्टुडंट्स आणि ऑफिस वर्कसाठी ‘हे’ पर्याय बेस्ट
भारतात लॅपटॉपच्या किमती बजेट आणि गरजेनुसार मोठ्या प्रमाणात बदलतात. जर तुम्हालाही सर्वात स्वस्त पण सर्वोत्तम फिचर्स असलेल्या लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर आजच्या लेखात आपण बजेट फ्रेंडली लॅपटॉपच्या किंमती जाणून घेऊयात.

नवीन लॅपटॉप खरेदी करताना सर्वात मोठा प्रश्न हा असतो की कमी बजेटमध्येही चांगल्या प्रोसेसरचा लॅपटॉप मिळू शकेल का? पण भारतीय बाजारपेठेत आज अनेक ब्रँड्स विद्यार्थी, ऑफिसचे काम आणि दैनंदिन वापरासाठी ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन बजेट-फ्रेंडली लॅपटॉप्स उपलब्ध करून देत आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण वेगवेगळ्या बजेट रेंजमधील लॅपटॉप्सच्या सुरुवातीच्या किमती आणि सर्वोत्तम व्हॅल्यू देत आहेत ते जाणून घेऊयात.
भारतीय बाजारात सर्वात स्वस्त लॅपटॉपची किंमत किती आहे?
भारतात एंट्री-लेव्हल लॅपटॉपची किंमत सुमारे 25 हजार रूपयांपासून सुरू होते. या किंमतीत, बेसिक ब्राउझिंग, डॉक्युमेंटचे काम आणि ऑनलाइन क्लासेस यांसारखी हलकी कामे सहजपणे हाताळली जातात, मात्र या रेंजमध्ये हेवी मल्टीटास्किंग किंवा गेमिंगची लॅपटॉप मिळत नाही.
30 हजारापेक्षा कमी किमतीत उपलब्ध पर्याय
30 हजारापेक्षा कमी किमतीचे लॅपटॉप परवडणाऱ्या किमतीत तुम्हाला हव्या असलेला परफॉर्मेंसचा उत्तम समतोल साधतात. या रेंजमध्ये विशेषतः विद्यार्थी, सामान्य वापरकर्ते किंवा दुसरे डिव्हाइस घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी योग्य आहे. या बजेटमध्ये वजनाने हलके आणि जास्त बॅटरी लाईफ असलेले मॉडेल्स सहज उपलब्ध आहेत, ज्यामुळे ते दीर्घकाळ अभ्यास करण्यासाठी आदर्श ठरतात.
50 हजारांपर्यंतच्या रकमेमध्ये कोणते फायदे उपलब्ध आहेत?
तुमचं बजेट ₹५०,००० पर्यंत वाढवलं, तर लॅपटॉपमध्ये परफॉर्मन्ससोबतच चांगले फीचर्सही मिळतात. या रेंजमध्ये Full HD डिस्प्ले, वेगवान SSD स्टोरेज आणि सुरळीत मल्टीटास्किंग करता येतं.
या बजेटमधील अनेक लॅपटॉपवर व्हिडिओ कॉल, ऑनलाइन क्लासेस, फोटो एडिटिंग आणि हलकं गेमिंग सहज करता येतं. त्यामुळे स्टुडंट्स, ऑफिस वर्क आणि रोजच्या वापरासाठी ₹५० हजारांपर्यंतचा लॅपटॉप हा चांगला पर्याय ठरू शकतो.
1 लाख रुपयांपर्यंतच्या बजेट लॅपटॉप कोणत्या वापकरर्त्यांसाठी योग्य आहे?
जे लोक कोडिंग, व्हिडिओ एडिटिंग किंवा हेवी मल्टीटास्किंगसारखी व्यावसायिक कामे करतात, त्यांच्यासाठी 50 हजार ते 1 लाख दरम्यानचे बजेट हा एक चांगला पर्याय आहे. या रेंजच्या लॅपटॉपमध्ये अधिक रॅम, उत्तम प्रोसेसर आणि वेगवान एसएसडी स्टोरेज मिळते, जे व्यावसायिक आणि सर्जनशील वापरकर्ते या दोघांच्याही गरजा पूर्ण करू शकते.
गेमिंग लॅपटॉपची किंमत यापेक्षा वेगळी असते
जर तुमचा मुख्य उद्देश गेमिंग असेल, तर थोडं जास्त बजेट ठेवावं लागेल. चांगल्या गेमिंग लॅपटॉपची किंमत साधारण ₹२ लाखांपर्यंत जाऊ शकते. या लॅपटॉपमध्ये दमदार ग्राफिक्स कार्ड, चांगली कूलिंग सिस्टीम आणि हाय-रिफ्रेश रेट स्क्रीन मिळते.
यावर हेवी गेमिंगसोबत व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक्सचं काम आणि एकाच वेळी अनेक कामं सहज करता येतात. त्यामुळे गेमिंग किंवा जड कामांसाठी असा लॅपटॉप चांगला पर्याय ठरू शकतो.
लॅपटॉप खरेदी करताना काय लक्षात ठेवावे
केवळ किमतीच्या आधारावर लॅपटॉप खरेदी करणे हा योग्य दृष्टिकोन नाही. तुमच्या गरजेनुसार रॅम, प्रोसेसर, स्टोरेजचा प्रकार (एसडी किंवा एचडी) आणि बॅटरी लाईफ यांसारख्या घटकांचा विचार करणे महत्त्वाचे आहे.
विद्यार्थ्यांना हलके डिझाइन आणि जास्त बॅटरी लाईफ असलेला लॅपटॉप पसंत पडू शकतो, तर व्यावसायिकांना अधिक रॅम आणि वेगवान प्रोसेसर असलेला लॅपटॉप अधिक पसंत पडू शकतो.