AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी, Motorola चा नवीन 5G फोन 10 डिसेंबरला बाजारात

Motorola भारतात आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे, या स्मार्टफोनचे नाव Moto G51 5G असे आहे. हा फोन गेल्या महिन्यात युरोपमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. आता हा मोबाईल भारतात लॉन्च होण्यासाठी सज्ज झाला आहे.

50MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी, Motorola चा नवीन 5G फोन 10 डिसेंबरला बाजारात
Moto G51 5G
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Dec 08, 2021 | 6:00 AM
Share

मुंबई : Motorola भारतात आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे, या स्मार्टफोनचे नाव Moto G51 5G असे आहे. हा फोन गेल्या महिन्यात युरोपमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. आता हा मोबाईल भारतात लॉन्च होण्यासाठी सज्ज झाला आहे. या फोनच्या प्रमुख स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात 50 मेगापिक्सल्सचा प्रायमरी कॅमेरा आहे. (Moto G51 to launch in India on 10th December, know price and features)

ऑगस्टच्या अखेरीस जागतिक स्तरावर लॉन्च झालेल्या Moto G50 5G मध्ये हा फोन अपग्रेड होण्याची शक्यता आहे. लीक्स सुचवतात की मोटोरोला क्वॉलकॉम प्रोसेसर वर स्विच करू शकते. Motorola ने Moto G50 5G मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरचा वापर केला होता. Lenovo ची मालकी असलेल्या कंपनीने नुकतेच Moto G40 आणि Moto G20 लाँच केले होते.

Moto G51 काय असेल खास?

  • मोटो G51 5G च्या कॅमेरा स्पेसिफिकेशनबद्दल खुलासा करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर, 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर असेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असू शकतो.
  • मोटो जी 51 मध्ये फुल-एचडी+ डिस्प्ले असू शकतो परंतु डिस्प्लेचा आकार अहवालात उघड करण्यात आलेला नाही. टेक्निक न्यूजने रिफ्रेश रेट जाहीर केला नाही परंतु असे म्हटले आहे की मोटोरोलाचा हा फोन नोव्हेंबरमध्ये लॉन्च होऊ शकते.
  • गीकबेंच लिस्टिंगने उघड केले आहे की, मोटो जी 51 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरद्वारे सपोर्टेड असू शकते. G50 5G ने Dimensity 700 SoC चा वापर केला आहे, परंतु चिप नसल्यामुळे, मोटोरोला कथितपणे Moto G51 5G मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेट वापरेल.
  • हा स्मार्टफोन दोन वेगवेगळ्या रॅम व्हेरिएंटसह लॉन्च केला जाऊ शकतो, ज्यात 4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅम व्हेरिएंटचा समावेश आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर चालणार आहे, परंतु तो अँड्रॉइड 12 मध्ये अपग्रेड केला जाऊ शकतो.
  • भारतात या स्मार्टफोनची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. या फोनच्या किमतीची माहिती लॉन्चिंग इव्हेंटनंतरच मिळणार आहे. मात्र, कंपनीने अद्याप किंमतीबाबत अशी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

इतर बातम्या

Redmi Note 10S चं नवीन स्टोरेज व्हेरिएंट भारतात लाँच, किंमत…

8GB/128GB, 50MP कॅमेरासह Vivo Y55s बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

Iphone 12 vs Iphone 13 : फक्त किंमत आणि कॅमेराच नव्हे तर आणखी बरेच फरक, जाणून घ्या तुमच्यासाठी परफेक्ट मॉडेल कोणतं?

(Moto G51 to launch in India on 10th December, know price and features)

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...