AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Oppo: मोबाईल प्रेमींसाठी आनंदाची बातमी! ओप्पोचे 2 तगडे स्मार्टफोन लाँच होणार, वाचा किंमत

तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण लवकरच Oppo Find X9 सीरिज लाँच होणार आहे. ओप्पो कंपनीने या फ्लॅगशिप सीरिजचे टीझिंग केले आहे.

Oppo: मोबाईल प्रेमींसाठी आनंदाची बातमी! ओप्पोचे 2 तगडे स्मार्टफोन लाँच होणार, वाचा किंमत
Oppo Smartphone
| Updated on: Sep 24, 2025 | 5:29 PM
Share

तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण लवकरच Oppo Find X9 सीरिज लाँच होणार आहे. ओप्पो कंपनीने या फ्लॅगशिप सीरिजचे टीझिंग केले आहे आणि त्याच्या प्रोसेसरची माहिती दिली आहे. ही फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिज गेल्या वर्षीच्या Find X8 सीरिजचे अपग्रेड असणार आहे. कंपनी Find X9 आणि Find X9 Pro हे दोन शक्तिशाली स्मार्टफोन लाँच करणार आहे. या दोन्ही फोनमधील फीचर्स आणि त्यांची किंमत जाणून घेऊयात.

कधी लाँच होणार ?

Oppo Find X9 सीरिजच्या लाँचची तारीख समोर आली आहे. कंपनी ही सीरिज 16 ऑक्टोबर रोजी चीनमध्ये लाँच करणार आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर या स्मार्टफोनसाठी प्री रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. या सीरिजधील फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 9500 प्रोसेसरला सपोर्ट करणार आहेत. तसेच हे फोन अँड्रॉइड 16 वर आधारित कलरओएस 16 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतील.

ओप्पोचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर पीट लाऊ यांनी Find X9 सीरिजच्या जागतिक लाँचची टीझिंग केली आहे. ही प्रीमियम स्मार्टफोन सीरिज चीननंतर जागतिक स्तरावर लाँच केली जाणार आहे. या सीरिजच्या बेस मॉडेलमध्ये 7000 एमएएच बॅटरी असेल, तर प्रो मॉडेलमध्ये 7500 एमएएच बॅटरी मिळण्याची शक्यता आहे.

200 एमपी कॅमेरा

Oppo Find X9 सीरिजमध्ये गेल्या वर्षी लाँच झालेल्या ओप्पो फाइंड एफ 8 सीरीज प्रमाणे हॅसलब्लॅडचा रियर कॅमेरा सेटअप असेल. या सीरिजच्या प्रो मॉडेलमध्ये 200 एमपी पेरिस्कोप कॅमेरा देखील असेल. तसेच कंपनी फोनसोबत फोटोग्राफी किट देखील देणार आहे. प्रो मॉडेलचा पेरिस्कोप कॅमेरा 70 मिमी फोकल लेंथ आणि f/2.1 अपर्चरला सपोर्ट करेल.

ओप्पोची मागील फाइंड एक्स 8 मालिका भारतात 69999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आली होती. मात्र आता नवीन सीरीजची किंमत मात्र जास्त असण्याची शक्यता आहे. नवीन सीरिजमधील प्रो मॉडेल 99,999 रुपयांच्या किमतीत सादर केले जाण्याची शक्यता आहे. तर बेस मॉडेलची किंमत ही 70 हजारांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.