फ्लिपकार्टवर Vivo T5 Lite 44W 5G ची विक्री सुरू, फोनच्या खरेदीवर मिळवा 1 हजार 500 रूपयांची सवलत

20 हजार ते 25 हजार रुपयांच्या किंमतीच्या रेंजमध्ये नवीन फोन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी Vivo T5 Lite 44W 5G स्मार्टफोन गेल्या आठवड्यात लाँच करण्यात आला होता आणि हा फोन आता 22 जुलैपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या फोनसोबत एक लाँच ऑफर देखील आहे. चला तर मग ही लाँच ऑफर कोणती आहे ते जाणून घेऊयात.

फ्लिपकार्टवर Vivo T5 Lite 44W 5G ची विक्री सुरू, फोनच्या खरेदीवर मिळवा 1 हजार 500 रूपयांची सवलत
| Edited By: | Updated on: Jul 30, 2026 | 12:10 AM

विवो कंपनीने गेल्या आठवड्यात त्यांचा नवीन स्मार्टफोन Vivo T5 Lite 44W 5G 16 जुलै 2026 भारतीय बाजारात लाँच केला आहे. आणि या मिड-रेंज स्मार्टफोनची विक्री 22 जुलैपासून फ्लिपकार्टवर सुरू झाली आहे. दुपारी 12 वाजता ग्राहकांसाठी फोनची विक्री सुरू झाली. तर हा फोन खरेदी करताना ॲक्सिस, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या कार्डांवर सरळ 1 हजार 500 रूपयांचे इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. ही ऑफर फक्त एका दिवसासाठी वैध आहे. हा विवो फोन वेव्ह ब्लू आणि ट्वायलाइट शॅडो या दोन व्हेरिएंटमध्ये येतो. 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 19 हजार 999 रूपये आहे. तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 21 हजार 999 रूपये आणि 6GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 24 हजार 999 रूपये आहे.

या फोनची विक्री कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर, तसेच फ्लिपकार्ट आणि सर्व भागीदार रिटेल स्टोअर्सवर सुरू झाली आहे. या किंमतीच्या रेंजमध्ये विवोचा हा नवीन मोबाईल फोन मोटोरोला जी57 पॉवर 5जी, रेडमी नोट 15 एसई 5जी आणि रियलमी पी4एक्स 5जी यांसारख्या स्मार्टफोन्सशी स्पर्धा करतो.

विवो टी5 लाइटची वैशिष्ट्ये

स्क्रीन: या फोनमध्ये 6.74-इंचाचा एलसीडी डिस्प्ले आहे, तसेच 1200 निट्स पीक ब्राइटनेस, 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि डोळ्यांचे संरक्षण यांसारखी अनेक खास वैशिष्ट्येही आहेत.

बॅटरी क्षमता: या फोनमध्ये 6500mAh क्षमतेची बॅटरी असून, ती 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, हा हँडसेट 38 मिनिटांत 1 ते 50 टक्के चार्ज होऊ शकतो. हा फोन रिव्हर्स वायर्ड चार्जिंगलाही सपोर्ट करतो.

प्रोसेसर: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी, Vivo T5 Lite 5G मध्ये MediaTek Dimensity 6300 5G चिपसेट देण्यात आला आहे.

एआय वैशिष्ट्ये: या फोनमध्ये एआय कॅप्शन, एआय क्रिएशन आणि गूगल जेमिनी यांसारखी अनेक पॉवरफूल एआय वैशिष्ट्ये आहेत. याव्यतिरिक्त विवो डॉक मास्टर आणि प्रायव्हेट स्पेस यांसारखी वैशिष्ट्ये देखील उपलब्ध आहेत.

कॅमेरा सेटअप: फोनच्या मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा IMX852 प्रायमरी सेन्सर आणि 0.08-मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आहे. सेल्फीसाठी 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us