AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सॅमसंगचा तगडा फोन तब्बल 12 हजारांनी स्वस्त… DSLR सारखा कॅमेरा अन् AI… फीचर्स वाचून चकित व्हाल

Samsung Galaxy S25 FE : सॅमसंगने सॅमसंग गॅलेक्सी S25 FE च्या किमतीत मोठी कपात केली आहे. हा फोन स्वस्त दरात उपलब्ध आहे. याचे फीचर्स जाणून घेऊयात.

सॅमसंगचा तगडा फोन तब्बल 12 हजारांनी स्वस्त... DSLR सारखा कॅमेरा अन् AI... फीचर्स वाचून चकित व्हाल
samsung galaxy s25 fe price dropImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Sep 02, 2026 | 7:41 PM
Share

सॅमसंगने आपला लोकप्रिय स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी S25 FE च्या किमतीत मोठी कपात केली आहे. कंपनीचा नवीन S26 FE लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता असताना जुन्या मॉडेलवर मोठी सूट मिळत आहे. अमॅझॉनवर सॅमसंग गॅलेक्सी S25 FE स्वस्त दरात उपलब्ध असून, ग्राहकांना या ऑफरचा फायदा घेता येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सॅमसंग गॅलेक्सी S25 FE हा फोन लॉन्चच्या वेळी 59,999 रुपयांना उपलब्ध होता. मात्र, आता अमॅझॉनवर त्याच्या 128GB व्हेरिएंटची किंमत 47,999 रुपये झाली आहे. म्हणजेच ग्राहकांना तब्बल 12,000 रुपयांची बचत करता येणार आहे. याशिवाय अमॅझॉन पे ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 1,500 रुपयांपर्यंत अतिरिक्त डिस्काऊंट मिळू शकतो. तसेच एक्सचेंज ऑफरअंतर्गत 30,000 रुपयांपर्यंतचा बोनस मिळू शकतो.

दमदार कॅमेरा

सॅमसंग गॅलेक्सी S25 FE मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये OIS सपोर्टसह 50MP मुख्य कॅमेरा, 3x ऑप्टिकल झूमसह 8MP टेलिफोटो कॅमेरा आणि 12MP अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 12MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

मजबूत डिस्प्ले आणि बॅटरी

फोनमध्ये 6.7 इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला असून, त्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 1,900 निट्सपर्यंत आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी Gorilla Glass Victus+ देण्यात आले आहे. सॅमसंग गॅलेक्सी S25 FE मध्ये 4,900mAh क्षमतेची बॅटरी आहे. फोनला 45W वायर्ड फास्ट चार्जिंग, 15W वायरलेस चार्जिंग आणि रिव्हर्स वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. फोनला IP68 रेटिंग असून, प्रोसेसिंगसाठी Exynos 2400 चिपसेट देण्यात आला आहे.

AI फीचर्सचीही सुविधा

सॅमसंग गॅलेक्सी S25 FE मध्ये अनेक AI फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये सर्कल टू सर्च, लाईव्ह ट्रान्सलेट, नोट असिस्ट, रायटिंग असिस्ट, फोटो असिस्ट, ऑब्जेक्ट इरेजर आणि ऑडिओ इरेजर यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे. नवीन S26 FE बाजारात येण्यापूर्वी सॅमसंग गॅलेक्सी S25 FE ची झालेली ही मोठी किंमत कपात ग्राहकांसाठी चांगली संधी ठरू शकते. विशेषतः प्रीमियम फीचर्स असलेला स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी हा पर्याय आकर्षक ठरू शकतो.

Follow Us
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार अन्...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा खुलासा; कुटुंबाकडून हादरवणारी माहिती समोर
महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
बुलढाण्यात राजकीय वाद विकोपाला; महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच...
चालता येईना... जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच आला समोर
कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
बाळासाहेब म्हणाले होते, माझ्या पक्षाची काँग्रेस... कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला: अमित ठाकरेंच्या निषेधार्थ सभा तहकूब
नंबर प्लेटबाबत विचारताच आमदाराची अरेरावी, चक्क शिवगाळ करत...खळबळजनक...
नंबर प्लेटबाबत विचारताच आमदाराची अरेरावी, चक्क शिवगाळ करत... खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल!
लक्ष्मण हाकेंचे आंदोलन स्थगित; मुंबईत बावनकुळेंशी चर्चा करणार
लक्ष्मण हाकेंचे आंदोलन स्थगित; मुंबईत बावनकुळेंशी चर्चा करणार
मोठी बातमी! राम मंदिरच्या नव्या CEO चे नाव जाहिर; थेट सेनेतील...
मोठी बातमी! राम मंदिरच्या नव्या CEO चे नाव जाहिर; थेट सेनेतील निवृत्त अधिकाऱ्याची नियुक्ती
ठाकरे गटाला मोठा धक्का? कोर्टाने याचिका फेटाळली; विशाखा राऊत नगरसेविका
ठाकरे गटाला मोठा धक्का? कोर्टाने याचिका फेटाळली; विशाखा राऊत नगरसेविका पद...