मोबाईल घेताय? Samsung Galaxy A70 चे फीचर्स पाहा!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून सॅमसंग या नामांकित स्मार्टफोन कंपनीद्वारे गॅलेक्सी A सीरिजचे स्मार्टफोन लाँच करण्यात येत आहेत. आता सॅमसंग नवा गॅलेक्सी A-70 फोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.7 इंच इतका असून त्यात वॉटरड्रॉप नॉच सिस्टम देण्यात आली आहे. येत्या 10 एप्रिल रोजी होणाऱ्या एका कार्यक्रमात हा फोन लाँच करण्यात येणार आहे. […]

मोबाईल घेताय? Samsung Galaxy A70 चे फीचर्स पाहा!
Follow us on

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून सॅमसंग या नामांकित स्मार्टफोन कंपनीद्वारे गॅलेक्सी A सीरिजचे स्मार्टफोन लाँच करण्यात येत आहेत. आता सॅमसंग नवा गॅलेक्सी A-70 फोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.7 इंच इतका असून त्यात वॉटरड्रॉप नॉच सिस्टम देण्यात आली आहे. येत्या 10 एप्रिल रोजी होणाऱ्या एका कार्यक्रमात हा फोन लाँच करण्यात येणार आहे.

Samsung Galaxy A-70 स्मार्टफोनची वैशिष्ट्ये

गॅलेक्सी A-70 या स्मार्टफोन Android pie वन यू आय (one UI)  टेक्नॉलॉजीवर काम करणार आहे. या फोनमध्ये ड्युअल सिम कार्ड आहे. त्याशिवाय या फोनमध्ये 6.7 इंच AMOLED फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये मागील बाजूस ट्रिपल रेअर कॅमेरा देण्यात आला आहे. त्यात 32 मेगापिक्सल सेन्सरचा प्राईम कॅमेरा, 8 मेगापिक्सल वाईड सेन्सर लेन्स आणि 5 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर लेन्स असेल. त्याशिवाय या फोनमध्ये 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे.

या फोनची बॅटरी 4500 mAh इतकी आहे. त्याशिवाय या फोनसाठी यूएसबी टाईप सी चार्जर देण्यात येणार आहे. यात 2.0GHz ऑक्टो कॉर प्रोसेसर देण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात 6 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी स्टोरेज तर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी असे दोन पर्याय उपलब्ध असतील. तसेच यात फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे.

या फोनमध्ये काळा, निळा, पांढरा, कोरल रंग उपलब्ध असून याची किंमत 20 हजार रुपयांपर्यंत असू शकते. हा फोन येत्या 10 एप्रिलला लाँच होणार असून, तेव्हा अधिकृत किंमत आणि फीचर्स कळू शकतील.

काही खास वैशिष्ट्य :

प्रोसेसर – ऑक्टा कोर

डिस्प्ले – 6.7″ (17.02 cm)

मेमरी – 128 जीबी

कॅमेरा – 32 MP + 8 MP+ 5MP

बॅटरी – 4500 mAh

रॅम – 6 जीबी/8जीबी

इंटरनल मेमरी – 128 जीबी

संबंधित बातम्या –

सॅमसंग लाँच करणार जगातील पहिला 5G स्मार्टफोन