AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय सांगता? बिल भरताय तुम्ही, WiFi वापरतंय दुसरंच कोणीतरी? चोरून इंटरनेट वापरणाऱ्यांना असं करा ब्लॉक

WIFI चे बील जास्त येत अश्या तक्रारी आपण करत असतो. पण तुम्हाला माहित आहे का? नेटवर्क जास्त वापरल्यामुळे बील तर येतच पण यामागे कोणीतरी तुमचे नेटवर्क चोरून वापरत असल्याचीही शंका असते. त्यामुळे वेळीच याकडे लक्ष द्या

काय सांगता? बिल भरताय तुम्ही,  WiFi वापरतंय दुसरंच कोणीतरी? चोरून इंटरनेट वापरणाऱ्यांना असं करा ब्लॉक
WIFI NETWORKImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 17, 2026 | 3:39 PM
Share

नेट- इंटरनेटच्या मागे लागण्यापेक्षा WiFi मुळे सुपरफास्ट काम होत बघा. एक WiFi संपूर्ण घरासाठी पुरेसं होत. त्यामुळे वारंवार फोनला रिचार्ज करण्याची कटकटच राहत नाही. डेटा जास्त वापरतोय म्हणून WiFi बीलही जास्त येत अशा तक्रारी आपण करत असतो. पण तुम्हाला माहित आहे? पासवर्ड माहित असेल तर WiFi चा वापर चोरून सुद्धा केला जातो, आणि त्याचा पत्ताही आपल्याला लागत नाही. अशाप्रकारे डिव्हाईस वेळीच शोधा

WiFi च्या नेटवर्कच्या अनोळखी युजरचा असा लावा पत्ता

WiFi सोबत जोडलेले डिव्हाईस शोधण्यासाठी सोप्पी पद्धत म्हणजे अॅडमिन पेज. सगळयात आधी आपल्या फोन किंवा लॅपटॉपला त्या WiFi नेटवर्कशी जोडा. यानंतर ब्राऊजर खोलून राऊटरचा IP अॅड्रेस टाका. मग यूजरनेम आणि पासवर्ड टाकून कनेक्ट करा. लॉग इन केल्यानंतर CONNECTED DEVICE, DEVICE LIST, DHCP CLIENTS WIRELESS CLIENTS या सेक्शन मध्ये जा. इथे तुम्हाला नेटवर्कला कनेक्ट असलेले डिव्हाईस पाहायला मिळतील.

दुसरे डिव्हाईस कनेक्ट असेल तर रिमूव्ह कसे करावे

जर तुम्हाला यात अनोळखी डिव्हाईस सापडले, तर समजून जा तुमच WiFi कोणीतरी फुकट वापरत आहे. सगळ्यात आधी WiFi चा पासवर्ड बदला. त्यानंतर WPA2 WPA3 SECURITY मोडचा वापर करा आणि राऊटरचा डिफॉल्ट पासवर्ड पण बदलून टाका. WPS चे फिचर बंद करण्यासोबतच अनोळखी डिव्हाईसला ब्लॉक करा.

हे मोबाईल अॅप्स करू शकतात तुम्हाला मदत

अनेक WiFi नेटवर्क कंपनी मोबाईल अॅपच्या माध्यमातून CONNNECTED DEVIVE ची माहिती आपल्याला पुरवत असतात. TP-LINK, D-LINK, ASUS NETGEAR यांसारखे ब्रँड्सच्या अॅपमुळे नेटवर्कशी जोडलेल्या डिव्हाईसचा आपण तपास लावू शकतो. याशिवाय FING यांसारखे नेटवर्क स्कॅनर अॅप डिव्हाईस ओळखायला मदत देखील करतात.

WiFi नेटवर्क सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे

WiFi नेटवर्क सुरक्षित ठेवण्यासाठी एक स्ट्ऱाँग पासवर्ड ठेवणे गरजेचे आहे. राऊटर कायम अपडेटेड असावे. याशिवाय GUEST NETWORK हा पर्यायचा देखील तुम्ही वापर करू शकता.

Follow Us
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ; कैलास पाटील...
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ, ठाकरेंचे आमदार थेट...
मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक
Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत...
धाराशिवमध्ये अजब कारभार; जिल्ह्यातील विकास समितीच्या बैठकीत... नेमकं काय घडतंय?