iPhone मधील i चा अर्थ काय? रोज ॲपलचा महागडा फोन वापरणाऱ्यांना माहिती आहे का?
Apple iPhone: आयफोनची नवीन सीरीज बाजारात येताच त्यावर उड्या पडल्या. नवीन सीरीजमधील फोल्डबल फोन महागडा असला तरी त्यासाठी बुकिंग सुरू आहे. पण आयफोनमधील i चा अर्थ काय हे तुम्हाला माहिती आहे का? त्याचा एक अर्थ नाही तर पाच अर्थ आहेत.

ॲपल कंपनीच्या नवीन आयफोनची सीरीज बाजारात आली आहे. iPhone Duo, iPhone 18 Pro, iPhone Pro Max महागडे असले तरी त्यावर ग्राहकांच्या उड्या पडल्या आहेत. या फोनमध्ये अनेक नवीन फीचर्सचा भडीमार आहे. ॲपलचे नवीन सीईओ जॉन टर्नस यांच्या नियुक्तीनंतर अत्यंत प्रीमियम आयफोनची सीरीज लाँच झाली. आकर्षक लूकसह या फोनची किंमत 3 लाख आणि त्यापेक्षा अधिक आहे. पण आयफोनच्या सुरुवातीलाच येणाऱ्या ‘i’ या अक्षराचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?
‘i’ चा एक नाही तर पाच अर्थ
आय फॉर इंटरनेट: 1998 साली स्टीव्ह जॉब्स यांनी पहिला iMac सादर केला. त्याकाळी इंटरनेटची संगणकाशी सांगड घालणे जिकरीचे मानले जात होते. पण ॲपलने त्यात क्रांती आणली. तेव्हापासून आयफोनच्या उत्पादनातील आय फॉर इंटरनेटसाठी असल्याचे सांगण्यात आले.
आय फॉर इन्डिव्हिड्युएल : तर या ‘i’ चा दुसरा अर्थ Individual म्हणजे वैयक्तिक असा होतो. कंपनीच्या दाव्यानुसार, हा स्मार्टफोन प्रत्येकाच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करणार आहे. प्रत्येक जण आवडीनिवडींनुसार स्वतःला जुळवून घेऊ शकतो.
आय फॉर इन्स्ट्रक्ट : तिसरा अर्थ आहे Instuct म्हणजे शिकवणे अथवा मार्गदर्शन करणे असा होतो. जेव्हा ॲपल कंपनीने त्यांचे कॉम्प्युटर आणि डिव्हाईस बाजारात आणला. त्यामागे कंपनीचा शिक्षण आणि अध्ययनासाठी पोषण वातावरणाचा उद्देश समोर आला होता. विद्यार्थी आणि युझर्सला मार्गदर्शन करणे आणि शिकवणे असा अर्थ होतो. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवीन संकल्पना रूजवणे असा त्याचा अर्थ होतो.
आय फॉर इन्फॉर्म : आय चा चौथा अर्थ हा ‘Inform’ म्हणजे माहिती देणे असा होतो. डिजिटल क्रांतीच्या युगात माहिती हा सक्सेस पासवर्ड मानल्या जातो. तर आयफोनमधील प्रीफिक्स आयचा अर्थ माहिती देणे, अपडेट ठेवणे असा आहे. यामध्ये लहानसहान सर्व घडामोडींचा समावेश आहे.
आय फॉर इन्स्पायर : i चा पाचवा अर्थ होतो, Inspire करणे, प्रेरणा देणे. आकर्षक लूक, डिझाईनसोबतच नाविन्य जपणे, तंत्रज्ञानाला सतत प्रोत्साहन देणे वापरकर्त्याला अधिक चांगली आणि अभिनव पद्धतीची डिव्हाईस हाती देणे हा त्याचा अर्थ आहे. स्टीव्ह जॉब्स यांनी i चे Internet, Individual, Instruct, Inform, Inspire हे अर्थ त्यावेळी सांगितले होते.