लवकरच शाओमी भारतात ‘Water Purifier’ लाँच करणार

चीनी कंपनी शाओमी (Xiaomi)  येत्या 17 सप्टेंबर रोजी भारतात 'Smart Living 2020' चे आयोजन करत आहे. या दरम्यान कंपनी 65 इंचाचा 'MI TV' आणि 'Mi Band 4' लाँच करणार आहे.

लवकरच शाओमी भारतात Water Purifier लाँच करणार
| Edited By: | Updated on: Sep 11, 2019 | 9:19 PM

नवी दिल्ली : चीनी कंपनी शाओमी (Xiaomi)  येत्या 17 सप्टेंबर रोजी भारतात ‘Smart Living 2020’ चे आयोजन करत आहे. या दरम्यान कंपनी 65 इंचाचा ‘MI TV’ आणि ‘Mi Band 4’ लाँच करणार आहे. त्याशिवाय ‘Water Purifier’ ही लाँच करणार आहे.

सोशल मीडियावर शाओमीने (Xiaomi) एक टीजर पोस्ट केला आहे. “‘MiWaterTDSTester’ सह आम्ही एक असा डिव्हाईस लाँच करत आहे, जो पाणी किती स्वच्छ आहे याची माहिती देणार आहे. पिण्याचे पाणी आपल्यासाठी आरोग्यदायी आहे की नाही याची खात्री तुम्ही कशी करणार? यासाठी तुम्ही विचार करु शकता नेमकं आम्ही तुमच्यासाठी काय घेऊन येत आहे, असं या टीझरमध्ये म्हटलं आहे.

“पाण्यात टीडीएसची पातळी 300 पेक्षा कमी नसावी, आपल्यामध्ये अधिक लोक अजूनही सुरक्षित नाही. पण 17 सप्टेंबरला यामध्ये बदल होणार आहे. सर्वांच्या घरात स्वच्छ पाणी प्यायला मिळणार आहे”, असं ट्वीट शाओमी इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट मनू कुमार जैन यांनी केलं आहे.

शाओमी इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट यांनी ट्वीट करुन माहिती दिल्याने ही माहिती नक्कीच खरी असेल, असं म्हटलं जात आहे. पण कंपनीने जर वॉटर प्यूरिफायर कमी किंमतीत लाँच केला तर लोक हे खरेदी करु शकतात, असही म्हटलं जात आहे.

चीनमध्ये शाओमी पहिल्यापासून वॉटर प्यूरिफायरची विक्री करत आहे. पण आता हे भारतातही विकले जाणार आहे. गेल्यावर्षी कंपनीने Smarter Living Event दरम्यान एअर प्यूरिफायर लाँच केले होते. त्याची किंमतही खूप कमी होती. त्यामुळे वॉटर प्यूरिफायरची किंमतही कमी असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.