AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊनच बैठकीतून उठणार

योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत काऊंटडाऊन सुरु झालं आहे. राज्य मागासवर्ग आयोगाची अखेरची बैठक पुण्यात सुरु झाली आहे. काहीही झालं, कितीही उशीर झाला तरी आज या बैठकीत निर्णय घ्यावाच लागणार आहे. कारण मराठा आरक्षणाबाबतचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत सादर करु, असं राज्य सरकारने हायकोर्टात सांगितलं आहे.  त्या पार्श्वभूमीवर मराठा […]

मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊनच बैठकीतून उठणार
| Edited By: | Updated on: Nov 13, 2018 | 7:03 PM
Share

योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत काऊंटडाऊन सुरु झालं आहे. राज्य मागासवर्ग आयोगाची अखेरची बैठक पुण्यात सुरु झाली आहे. काहीही झालं, कितीही उशीर झाला तरी आज या बैठकीत निर्णय घ्यावाच लागणार आहे. कारण मराठा आरक्षणाबाबतचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत सादर करु, असं राज्य सरकारने हायकोर्टात सांगितलं आहे.  त्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण देता येईल की नाही यासाठीची राज्य मागासवर्ग आयोगाची अखेरची बैठक पुण्यात सुरू झाली आहे.  आज कितीही उशीर झाला तरी आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी आयोगाकडून गठीत करण्यात आलेली समिती आपलं काम पूर्ण करणार आहे.  बुधवारी संध्याकाळी किंवा गुरुवारी राज्य मागासवर्ग आयोग त्यांनी तयार केलेला अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे.  त्यानंतर सरकार तो न्यायालयात सादर केला जाईल.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीची पडताळणी करण्यासाठी आयोगानं राज्यातील पाच वेगवेगळ्या विभागांमधील पाच संस्थांकडून सर्वेक्षण करून घेतले होते.  जुलै महिन्याच्या अखेरीस सर्वेक्षणाचे रिपोर्ट आयोगाला सादर करण्यात येणार आले. आजच्या अखेरच्या बैठकीला आयोगाचे सदस्य आणि अध्यक्षांबरोबरच समाजशास्त्रज्ञही उपस्थित आहेत.

राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती एम जी गायकवाड, ओबीसी आयोगाचे मेंबर सेक्रेटरी डी .डी. देशमुख, आयोगाचे सदस्य यांच्यामध्ये ही बैठक सुरू आहे.

मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस

मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यात यावं, अशी मागासवर्ग आयोगाने शिफारस केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात अभ्यास करणारा अहवाल मागासवर्ग आयोगाने तयार केला आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल 15 तारखेपूर्वी राज्य सरकारला सादर होण्याची शक्यता आहे.

Follow Us
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महत्त्वाची बैठक सुरू, बारामतीतील...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच...
पाहणारे पाहतच राहिले! मुंबईत समुद्राला तुफान भरती, 4.26 मीटर उंच उसळल्या लाटा
उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
Badlapur | धोक्याची घंटा! उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली; बदलापूरमध्ये पूराचा मोठा धोका
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट,
सतर्क राहा...मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन! 8 तारखेपर्यंत अलर्ट, 300 मिमी पावसासह ढगफुटी...
प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
मोठी बातमी! प्रशासनाचा मोठा निर्णय; पुढील आदेशापर्यंत मुंबई–पुणे एसटी बस बंद
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील
पुणे हादरलं! मावळमधील दरड दुर्घटनेत तीघांचा मृत्यू तर एकाच कुटुंबातील... थरकाप उडवणारे दृश्य समोर
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद
Nashik | नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट! शाळा, बाजार, मंदिरेही बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय