Viral Video : अरे देवा काय हे! २०० टनांचं महाकाय वेसल घेऊन ३०८ चाकांचा ट्रक उत्तर प्रदेशात दाखल; बघ्यांची जमली तोबा गर्दी
बेल्जियमहून समुद्रमार्गे ओडिशातील पारादीप बंदरात आणलेलं सुमारे २०० टन वजनाचं औद्योगिक वेसल आता विशेष ३०८ चाकांच्या ट्रेलरवरून उत्तर प्रदेशातील बलरामपूरच्या दिशेने नेलं जात आहे. त्याला पाहण्यासाठी रस्त्यावर बघ्यांची तोबा गर्दी जमली आहे. त्यासंदर्भात व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

आपल्या गावाकडं एखादा मोठा ट्रक आला कि पोरं लगेच त्याच्या मागे धावतात….पण हा ट्रक बघितलात तर पोरंच काय भले भले त्याच्या मागे पळतील, काही जण तर तासन्तास बघतच बसतील. कारण हा काही साधासुधा ट्रक नाहीये. चक्क ३०८ चाकं असलेला हा महाकाय ट्रक तब्बल २०० टनांच एक भलंमोठं वेसल घेऊन भर रस्तात्यून निघालाय. आता एवढा मोठाला ट्रक रस्त्यातून जातोय म्हटल्यावर बघ्यांची गर्दी जमणारच.सोशल मीडियावर सध्या हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
बेल्जियमहून आलं २०० टनांचं वेसल
हे भलंमोठं वेसल बेल्जियमहून समुद्रमार्गे भारतात आणण्यात आल आहे. ओडिशातील पारदिप बंदरावर आल्यानंतर ते विशेष ३०८ चाकांच्या हायड्रोलिक मॉड्युलर ट्रेलरवर लादण्यात आलं. त्यानंतर ओडिशा, झारखंड आणि बिहारमार्गे हा महाकाय ट्रक आता उत्तर प्रदेशात दाखल झाला आहे.
बलरामपूरच्या प्लांटकडे प्रवास
हे वेसल म्हणजे व्हॅक्यूम बॉयलर रिअॅक्टर वेसल आहे. उत्तर प्रदेशातील लखमीरपूर खेरी येथे सुरू असलेल्या बलरामपूर चिनी मिल्स हा प्रोजेक्ट सुरू आहे. त्यामुळे या वेसलची गरज लागणा र असल्याने बेल्जियम मधून हा २०० टनाचा महाकाय वेसल मागवला गेला आहे. या मशीनची उंची जवळपास ८ मीटर आणि रुंदी 7 मीटर आहे. त्यामुळे इतर मार्गाने नेणे शक्य नसल्याने यासाठी रस्तेमार्गाचा वापर करण्यात आला आहे.
यूपी में एंट्री ले चुका है ‘बाहुबली ट्रक’! 308 टायरों वाले इस महा-मॉन्स्टर को देखकर उड़ जाएंगे होश! 🚚 आखिरकार यूपी में एंट्री ले चुका है 308 टायरों वाला ये ‘बाहुबली ट्रक’! 🤯🚚 बेल्जियम से आया 200 टन का महा-वैक्यूम बॉयलर लेकर यह मॉन्स्टर ट्रांसपोर्टर बलरामपुर शुगर मिल की तरफ बढ़… pic.twitter.com/PVYeg6Ipw0
— Arun Shivhare (@ArunShivhare100) September 27, 2026
३०८ चाकांचा बाहूबली ट्रक
बलरामपूर साखर कारखान्यासाठी आणलेले २०० टन वजनाचे विशालकाय वेसल वाहून नेण्यासाठी ३०८ चाके असलेल्या आणि १०० फूट लांब असलेल्या हायड्रॉलिक मॉड्युलर ट्रान्सपोर्टरवर चढवण्यात आले आहे. त्याचसोबत २ मोठ्या क्रेनही त्याचा बाजूने चालत आहेत. एवढे मोठे वजन घेत ही ट्रॉली दिवसाला ८ ते १२ किलोमीटरचा प्रवास दर दिवसाला करत आहे.
ट्रक पाहण्यासाठी लोाकांची गर्दी
हा महाकाय ट्रक ज्या ज्या भागातून जात आहे,तिथे त्याला पाहण्यासाठी लोकांची तुडुंब गर्दी होत आहे. अनेक जण मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ शूट करत आहेत. जवळपास १०० फूट लांबीचा असणारा हा ट्रक आणि त्यावर ठेवलेलं विशाल वेसल पाहताना अनेकांसाठी हा वेगळाच नजारा ठरत आहे. सोशल मीडियावर याचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
