Video | 63 वर्षांच्या ‘डान्सिंग दादी’नं मोह मोह के धागे गायलं, श्रोते म्हणाले, ‘वन्स मुअर आजी’

Video | 63 वर्षांच्या 'डान्सिंग दादी'नं मोह मोह के धागे गायलं, श्रोते म्हणाले, 'वन्स मुअर आजी'
Image Source - Instagram Screenshot

इन्स्टाग्रामवर रावी बाला शर्मा या प्रचंड ऍक्टिव्ह असतात. इन्स्टावर त्यांचे 186000 इतके फॉलोअर्स आहेत. आतापर्यंत त्यांनी आपल्या इन्स्टाग्रावर अकाऊंटवर 113 पोस्ट केल्या आहेत. वय ही फक्त एक संख्या आहे, असं आपल्या बायोमध्ये लिहिणाऱ्या रावी शर्मांना खरंच आजी म्हणावं का हाही खरा प्रश्न आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 04, 2022 | 3:08 PM

साल 2015. भूमी पेडणेकर आणि आयुषमान खुरानाचा एक सिनेमा आला होता. सिनेमाच्या नावापेक्षाही लोकांना लक्षात राहिलं, ते सिनेमाचं एक खास गाणं. मोह मोह के धागे…! दम लगा हैश्शा सिनेमातलं हे गाणं आजही लोकं लूप मोडवर ऐकतात. प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला आवडेल, असं हे सुंदर गीत आजही तितकंच तरुण आणि मन प्रसन्न करणारं आहे.

एक काळ होता, जेव्हा मोह मोह के धागे कॉलरट्यूनची धूम होती. मधल्या काळात 6 वर्ष निघून गेली. पण या गाण्याचा मोह अजूनही रसिक श्रोत्यांना कमी झालेला नाही. मोनाली ठाकूर आणि पॅपोनच्या गोड आवाजानं या गाण्याला चारचांद लावले होते. त्यानंतर अनेक घरगुती कलाकारांनी ह्या गाण्याचे आपआपले वर्जन्स बनवले. त्यातही तरुण मुलामुलींनी हे गाणं रिक्रीएट केल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा गाजले. पण आता तर चक्क एका आजीबाईंनी मोह मोह के धागे गायलं. त्यांनी गायलेलं हे गाणं ऐकून चाहत्यांनाही वन्स मुअर म्हणण्याचा मोह आवरला नाही.

कुणी गायलंय गाणं?

इन्स्टाग्रामवरील हजारो वेरीफाईड अकाऊंटपैकी एक अकाऊंट आहे रावी बाला शर्मा यांचं. डान्सिंग दादी म्हणून प्रसिद्ध असलेल्या रावी आजींचं वय आहे 63 वर्ष. इन्स्टाग्राम काय फक्त तरुणांनी वापरायची गोष्ट थोडीच आहे? म्हातारी-कोतारी माणसंही काही कमी टॅलेंडेड नाहीत, हे स्वतःला डान्सिंग दादी म्हणवणाऱ्या आजींनी सिद्ध केलंय.

आधी आपल्या ठुमक्यांनी चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आजींना आता आपल्या सुरानं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलंय. दम लगा के हैश्या या सिनेमातलं प्रसिद्ध असलेलं मोह मोह के धागे हे गाणं त्यांनी रिक्रिएट केलंय. कराओके ट्रॅकवर हे गीत गाणाऱ्या रावी शर्मा यांनी आपल्या गाण्याचा व्हिडीओ इन्टाग्रावर शेअर केलाय. हा व्हिडीओपाहून चाहतेही घायाळ झालेत. पाहा हा आजीबाईंनी गायलेलं हे गाणं… त्यानंतर त्यांच्याबद्दल बरंच काही आहे जाणून घेण्यासाठी…

पाहा डान्सिंग दादीची गायकी

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravi Bala Sharma (@ravi.bala.sharma)

इन्स्टाग्रामवर रावी बाला शर्मा या प्रचंड ऍक्टिव्ह असतात. इन्स्टावर त्यांचे 186000 इतके फॉलोअर्स आहेत. आतापर्यंत त्यांनी आपल्या इन्स्टाग्रावर अकाऊंटवर 113 पोस्ट केल्या आहेत. वय ही फक्त एक संख्या आहे, असं आपल्या बायोमध्ये लिहिणाऱ्या रावी शर्मांना खरंच आजी म्हणावं का हाही खरा प्रश्न आहे. मनानं तरुण असलेल्या आणि वयानं ज्येष्ठ झालेल्या या आजींनी इन्स्टावरील भल्याभल्यांना धक्का देत आपल्या टॅलेंटची दखल घ्यायला भाग पाडलंय.

पाहा आजीबाईंचे ठुमके!

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravi Bala Sharma (@ravi.bala.sharma)

इतर बातम्या –

VIDEO : काय सांगता…! चक्क माणसाप्रमाणे माकडाने घातली त्याच्या तान्हुल्या लेकराला अंघोळ!

VIDEO : अंगावर काटा आणणारा व्हिडीओ! चक्क एका मुलीने घेतली चित्त्याची किस्स…व्हिडीओ पाहून अवाक व्हाल

पाहा व्हिडीओ –


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें