AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

99 वर्षाच्या आजीचा कारनामा, हवेत उडत्या विमानाच्या पंखावर उभं राहून दाखवला स्टंट, बनवून टाकला World Record

वयाच्या 99 वर्षी आजींनी असा काही पराक्रम केलाय की बघाणाऱ्यांच्या काळजाचा थरकापच उडेल. 99 वर्षांच्या या आजीने विमानाच्या पंख्याला स्वत:ला बांधून आकाशात भरारी घेतली आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

99 वर्षाच्या आजीचा कारनामा, हवेत उडत्या विमानाच्या पंखावर उभं राहून दाखवला स्टंट, बनवून टाकला World Record
viral videoImage Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 19, 2026 | 3:08 PM
Share

वय झालं कि अनेक जण आराम करायचा विचार करतात. काही जण घराबाहेर पडणंही कमी करतात. पण राव, काही माणसं अशी असतात की त्यांच्यासाठी वय हा फक्त आकडा असतो. आता या 99 वर्षांच्या आजींचच बघा ना! या वयात त्यांनी असं काही करून दाखवलंय की भल्याभल्यांनाही आश्चर्याचा धक्का बसेल. चक्क विमानाच्या पंख्यावर उभं राहून त्यांनी उड्डाण केलं आणि आपल्या नावावर नवा विक्रम नोंदवलाय.

या आजींच नाव आहे हेल्गा डफी. जर्मनीत जन्मलेल्या हेल्गा यांनी वयाच्या 99 व्या वर्षी हा काळजाचा ठोका चुकवणारा पराक्रम केला आहे. 16 ऑक्टोबर 2026 रोजी ब्रिटनमधील ग्लॉस्टरशायर येथील RFC रेंडकॉम्ब एअरफिल्डवर त्यांनी हा विक्रम केला. त्यावेळी त्याचं वय 99 वर्ष होतं. त्यामुळे विमानाच्या पंख्यावर उभं राहून उड्डाण करणाऱ्या सर्वात वयोवृद्ध महिलेचा विक्रम त्यांच्या नावावर झाला.

आता विमानात बसून प्रवास करणं आणि विमानाच्या पंख्यावर उभं राहून आकाशात उड्डाण करणं. या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हेल्गा यांनी विमानाच्या पंखावर स्वत: ला बांधून घेतल आणि हवेत उड्डाण केलं. या प्रकाराल विंग वॉकिंग म्हणतात.ऐकतानाच अंगावर काटा येतोय ना ? पण हेल्गा यांनी हा अनुभव प्रत्यक्ष जगला आहे.

हेल्गा यांना हा पराक्रम करण्याची प्रेरणा 97 वर्षांच्या बेट्टी ब्रोमेज यांच्याकडून मिळाली. बेट्टी यांनीही याआधी विंग वॉकिंग करून दाखवलं होतं. त्यांच्यापासून प्रेरणा घेत हेल्गा यांनीही हे आव्हान स्वीकारलं आणि विश्वविक्रमाला गवसणी घातली.

हेल्गा यांनी केलेला हा पराक्रम केवळ नाव कमावण्यासाठी नाही केला तर सामाजिक कार्यातही हातभार लावला आहे. या पराक्रमातून मिळालेला निधी त्यांनी एअर अॅम्बुलन्स सेवेसाठी दिला आहे.  पण काहीही म्हणा,    वयाच्या 99 व्या वर्षी विमानाच्या पंख्यावर उभं राहून विक्रम करणाऱ्या या आजींच्या जिद्दीला दाद तर द्यायलाच हवी

Follow Us
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी...
Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी; फोन करणारा कोण?
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण; आगरी-कोळी संघटनांची थेट....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण; आगरी-कोळी संघटनांची थेट गणेश नाईकांकडे धाव
मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात...
Manoj Jarange : Dasara Melava : मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात, जरांगे पाटील उद्या काय बोलणार? महाराष्ट्राचं लक्ष
टायगर श्रॉफला भेटले मात्र...; राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
Ram Purneker On Tiger Shroff Car : टायगर श्रॉफला भेटले मात्र आमच्यासाठी वेळ नाही; राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
राहुल बोंद्रे यांच्या अडचणी वाढल्या! शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी...
राहुल बोंद्रे यांच्या अडचणी वाढल्या! शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी पोलिसांची नोटीस
पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचे विरोधकांना खुले आव्हान;
पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचे विरोधकांना खुले आव्हान; म्हणाले...
वाशिममध्ये दुष्काळाचा कहर! पाण्याअभावी हळदीचे पीक वाळले, शेतकरी...
वाशिममध्ये दुष्काळाचा कहर! पाण्याअभावी हळदीचे पीक वाळले, शेतकरी हतबल
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात, महायुतीची आघाडी
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात, महायुतीची आघाडी
शिंदे टायगर श्रॉफला भेटले, मग पुर्णेकर कुटुंबाला का नाही भेटले?- राऊत
Sanjay Raut: शिंदे टायगर श्रॉफला भेटले, मग पुर्णेकर कुटुंबाला का नाही भेटले?
टायगर श्रॉफ प्रकरणी CM फडणवीसांचा आक्रमक पवित्रा! मुंबई पोलीस ॲक्शन...
टायगर श्रॉफ प्रकरणी CM फडणवीसांचा आक्रमक पवित्रा! मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये