Navratri New Trend 2026: यंदाच्या नवरात्रीत देशभक्तीचा रंग! गरबा खेळणाऱ्या तरूणांच्या पाठीवर कॅप्टन स्मित यांचा टॅटूंची क्रेझ; देशभक्तीचा नवा ट्रे्ंड
अहमदाबादमध्ये नवरात्रीच्या उत्साहात तरुणाईच्या तात्पुरत्या टॅटूंनी वेधलं लक्ष. कॅप्टन स्मित मच्छार यांच्या चित्रांसह कॉमनवेल्थ गेम्स २०३०ची थीमही लोकप्रिय होत आहे.

नवरात्री आली कि तरूणाईला गरब्याचे वेध लागतात. कुणी नव्या चनियाचोळी घेण्यात बिझी असतात तर कोणी ऑक्सिडाईंजड दागिने घेण्यात गुंतलेले असतात. थोडक्यात काय तर गरब्याच्या मैदानात आपल्याकडे लक्ष कस जाईल यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न सुरू असतात. पण यंदा अहमदाबादच्या नवरात्रीमध्ये तरूणाई मध्ये वेगळ्याच गोष्टीची क्रेझ पाहायला मिळत आहे. तरूणाईच्या पाठीवर यावर्षी पान फुलांचे, प्राण्यांचे टॅटू नाही तर चक्क कॅप्टन स्मित यांचा फोटो आणि त्यांच्या संबंधित गोष्टीच्या टॅटूंची क्रेझ पाहायला मिळत आहे.
कॅप्टन स्मित हे भारतीय गुजराती नागरिक आहेत. विमानातील सहवैमानिकाने केलेल्या त्या प्रसंगादरम्यान त्यांनी सावधानता बाळगून मोठा अनर्थ टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या धाडसामुळे त्यांचे जगभरात कौतुक झाले. एका भारतीय माणसाने दाखवलेल्या या धाडसामुळे भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. स्मित हे मुळात गुजराती असल्याने अहमदाबादच्या तरूणांनी त्यांना या विशेष पद्धतीने थँक्यू म्हणायचं ठरवलं.
#WATCH अहमदाबाद, गुजरात: नवरात्रि से पहले युवा ‘कैप्टन स्मित’ और ‘CWG 2030’ जैसी थीम पर टैटू बनवा रहे हैं। (08.10) https://t.co/APF8SBxUxj
— ANI_HindiNews (@AHindinews) October 8, 2026
हे टॅटू जरी तात्पुरता स्वरूपातील आहे. टॅटू जरी तात्पुरता स्वरूपातील असले तरी त्यातून तरूणांची देशभक्ती देखील दिसून येत आहे. हा टॅटू केवळ दिसायला वेगळा म्हणून काढलेला नाही तर धाडसी वैमानिकाबद्दल आदर व्यक्त करण्याची छोटीशी पद्धत आहे.
पण एवढ्यावरच हा ट्रेंड थांबलेला नाही ! अहमदाबादमध्ये 2030 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकूल क्रिडा स्पर्धांशी संबंधित टॅटूही तरूणांच्या पसंतीस पडत आहेत. कोणी धाडसी थिम निवडतयं तर कोणी आगामी क्रिडा स्पर्धांची. यंदाच्या नवरात्रीत टॅटूच्या माध्यमातून आपली आवड आणि अभिमान व्यक्त करण्याचा झेन – झी चा हा नवा प्रकार पाहायला मिळतोय
