Video: मालकाने कोंबडीला पिंजऱ्यात डांबलं, त्यानंतर कोंबड्याने असं काही केलं की, नेटकरी कोंबड्याच्या प्रेमात पडले!

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती कोंबडीला जबरदस्तीने पकडून पिंजऱ्यात बंद करतो, असं करत असताना कोंबडा त्या व्यक्तीला चोचा मारतो, पण त्याला यश येत नाही.

Video: मालकाने कोंबडीला पिंजऱ्यात डांबलं, त्यानंतर कोंबड्याने असं काही केलं की, नेटकरी कोंबड्याच्या प्रेमात पडले!
कोंबडा कोंबडीचा व्हायरल व्हिडीओ
| Edited By: | Updated on: Dec 03, 2021 | 1:52 PM

इंटरनेटचे जग मजेदार व्हिडिओंनी भरलेले आहे. काही वेळा सोशल मीडियावर असे व्हिडीओ अपलोड केले जातात, जे पोस्ट होताच धुमाकूळ घालतात आणि यूजर्सही ते मोठ्या आनंदाने पाहतात. सध्या कोंबड्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, जो काही व्हिडिओ अतिशय भावनिक आहे. तर काही लोकांना हा व्हिडीओ मजेदार वाटतो आहे. (Amazing Viral video Cock and hen release his part from cage people will love this video Chicken Video)

सध्या सोशल मीडियावर एक कोंबडा कोंब़डीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हालाही जब कोई बात बिगड जाएं… हे गाणं आठवेल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती कोंबडीला जबरदस्तीने पकडून पिंजऱ्यात बंद करतो, असं करत असताना कोंबडा त्या व्यक्तीला चोचा मारतो, पण त्याला यश येत नाही. पण त्याला यश येत नाही. हा व्यक्ती कोंबडीला पिंजऱ्यात बंद करतो आणि तिथून निघून जातो. त्यानंतर कोंबडा जे करतो, त्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

हा व्हिडिओ पाहा

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ, आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी शेअर केला आहे. ज्याला बातमी लिहोपर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, जब कोई बात बिगड जाए, तू देना साथ मेरा…यासोबतच अनेक यूजर्सनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

सोशल मीडियावर हा मजेशीर व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. यामुळेच अनेक युजर्सनी व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. एका युजरने सांगितले की, हे दृश्य खरोखरच भावनिक आहे, मी त्यांच्या प्रेमात पडलो. तर दुसर्‍याने लिहिले की, मी या वर्षी पाहिलेला हा सर्वोत्कृष्ट व्हिडिओ आहे!. याशिवाय इतर अनेक यूजर्सनी या व्हिडिओचे वेगवेगळ्या प्रकारे कौतुक केले.

पाहा व्हिडीओ:

Video: हात नसलेल्या चिमुरड्याला जेव्हा कृत्रिम हात बसवतात, पाहा त्याची न विसरता येणारी रिएक्शन!

Video: सलूनमध्ये आरामात बसून दाढी करणारं माकडं, लोक म्हणाले, भावाचं, आज लग्नय वाटतं!