Video: सलूनमध्ये आरामात बसून दाढी करणारं माकडं, लोक म्हणाले, भावाचं, आज लग्नय वाटतं!

एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये माकड खुर्चीवर बसून सलून चालकाकडून दाढी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक कमेंट केल्याशिवाय राहू शकत नाहीत.

Video: सलूनमध्ये आरामात बसून दाढी करणारं माकडं, लोक म्हणाले, भावाचं, आज लग्नय वाटतं!
सलूनमध्ये बसून दाढी करणारं माकड

माकडांना माणसांचं पूर्वज म्हटलं जातं. कारण, त्यांचे सगळे काही गुण हे माणसांसारखेच असतात. एवढेच नाही तर माकडांचे छंदही माणसासारखे असतात. यामुळेच त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर येताच व्हायरल होतात. हे व्हिडीओ पाहून बऱ्याचदा आपण आश्चर्यचकित होतो, त्याचवेळी काही व्हिडिओ असे देखील समोर येतात. ज्याला पाहून आपण आपल्या हसण्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. गेल्या काही दिवसांत असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये माकड खुर्चीवर बसून सलून चालकाकडून दाढी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक कमेंट केल्याशिवाय राहू शकत नाहीत. (Funny Video of Monkey goes to barber for a shave in hilarious video people laugh)

सोशल मीडियावर माकडाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो सलूनमध्ये दाढी करताना दिसत आहे. हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी रुपिन शर्मा यांनी ही क्लिप ट्विटरवर पोस्ट केली होती आणि ती ऑनलाइन 1,000 पेक्षा जास्त वेळा पाहिली गेली आहे.

व्हिडीओ पाहा:

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये माकडाभोवती सलूनचं कापड गुंडाळण्यात आलं आहे, जेणेकडून केस त्याच्या अंगावर पडू नये. हे माकड खुर्चीवर आरामात बसलं आहे, त्याच्यासमोर आरसा आहे. सलून चालकाने प्रथम त्याच्या चेहऱ्यावरचे केस विंचरले आणि नंतर इलेक्ट्रिक ट्रिमरने ते छाटण्यास सुरुवात केली. व्हिडिओमध्ये माकड अतिशय शांतपणे बसलेले दिसत आहे.अनेकजण या माकडाचं व्हिडिओ रेकॉर्डिंगही करत आहेत. तुम्ही याआधी सलूनमध्ये क्वचितच माकड पाहिले असेल, लोकांना हा व्हिडिओ इतका आवडला आहे की ते त्यांच्या प्रतिक्रिया शेअर करत आहेत.

एका युजरने लिहलं आहे, दाढी एकदम मस्त कर, कारण, आज माझं लग्न आहे, तर दुसऱ्याने लिहलं आहे की, माकडाचा स्वॅग एकदम भारी आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर धूमाकूळ घालत आहे.

हेही पाहा:

Video: स्कूटी पार्क करताना स्टंट करण्याचा प्रयत्न, स्कूटी घसरली आणि त्यानंतर नेटकरी पोट धरुन हसले!

Video: बिबट्या शाळेच्या वर्गात शिरला, आणि त्यानंतर काय घडलं, पाहा हादरवणारा व्हिडीओ!

Published On - 1:00 pm, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI