Video: बिबट्या शाळेच्या वर्गात शिरला, आणि त्यानंतर काय घडलं, पाहा हादरवणारा व्हिडीओ!

इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. अलीगढमधील एका महाविद्यालयातील वर्गात बिबट्या घुसल्याचा हा व्हिडीओ आहे.

Video: बिबट्या शाळेच्या वर्गात शिरला, आणि त्यानंतर काय घडलं, पाहा हादरवणारा व्हिडीओ!
महाविद्यालयाच्या वर्गात बिबट्या शिरला

बिबट्या…असा प्राणी ज्याच्या चपळतेची तुलना होऊ शकत नाही. आपल्या हुशारी, चलाखी आणि शिकार करण्याच्या कौशल्यामुळे बिबट्या कुठेही राहू शकतो. मात्र, असं असलं तरी बिबट्यासारखा आक्रमक प्राणीही नाही. एकीकडे माणूस जंगलं संपवत आहे, तर दुसरीकडे आपलं घर गेल्याने बिबट्यांवर मानवी वस्तीत शिरण्याची वेळ आली आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये बिबट्या चक्क एका शाळेच्या वर्गात असल्याचं दिसत आहे. (Animal Attack video Leopard attacks student after entering college in Aligarh Watch video)

बिबट्या संपूर्ण जंगलात त्याच्या चपळाईसाठी ओळखला जातो हे आपणा सर्वांना माहीत आहे, परंतु माणसांच्या वाढत्या लोभामुळे आता त्यांचं घरं उद्ध्वस्त होऊ लागलं आहे. त्यामुळे आता मानवी वस्तीत बिबट्याचा हस्तक्षेप वाढला आहे. याच्याशी संबंधित एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल. इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. अलीगढमधील एका महाविद्यालयातील वर्गात बिबट्या घुसल्याचा हा व्हिडीओ आहे. यात एक विद्यार्थी जखमी झाला, पण नंतर त्याची सुटका करण्यात आली.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना तो आपली प्रतिक्रिया देत आहे. एका यूजरने लिहिले – देवाचे लाख लाख आभार मानायला हवे, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हेही पाहा:

Video: पाण्यात कासव आणि मगरीचं हात मिळवून ‘हाय-हॅलो’, नेटकरी म्हणाले, असा व्हिडीओ आधी पाहिला नाही

Video: बटाटे कापणाऱ्या पाकिस्तानी मुलीच्या सौंदर्यावर नेटकरी घायाळ, सोशल मीडियावर अमिनाचीच चर्चा!

 

Published On - 11:28 am, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI