AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: स्कूटी पार्क करताना स्टंट करण्याचा प्रयत्न, स्कूटी घसरली आणि त्यानंतर नेटकरी पोट धरुन हसले!

व्हिडिओच्या सुरुवातीला घराची पडवी दिसत आहे. काही वेळाने दोन महिला स्कूटीवर येतात आणि काही क्षणांनी त्या घसरुन खाली पडतात. व्हिडिओमध्ये त्यांची स्कूटी एका बाजूला सरकताना दिसत असून दोन्ही महिला दुसऱ्या बाजूला पडल्या आहेत

Video: स्कूटी पार्क करताना स्टंट करण्याचा प्रयत्न, स्कूटी घसरली आणि त्यानंतर नेटकरी पोट धरुन हसले!
स्कूटीवरुन महिला घसरल्या
| Edited By: | Updated on: Dec 03, 2021 | 11:57 AM
Share

तुम्ही सोशल मीडियाच्या दुनियेत सक्रिय असाल, तर तुमच्याकडे रोज मजेशीर व्हिडिओ येत असतील. यामध्ये अनेक वेळा आश्चर्यकारक गोष्टी घडतात, तर कधी कधी काही गोष्टी समोर येतात, ज्या पाहिल्यानंतर हसू येते. इतरांना हुशारी दाखवणे कधी कधी अंगाशी येतं.अशा परिस्थितीत आजूबाजूचे लोक त्याची चेष्टा करतात. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. हा पाहिल्यानंतर तुम्हालाही असेच, काहीसे वाटेल की या महिलांच्या बाबतीत असे घडायला नको होतं. (Funny Accident Video of Woman was doing stunts inside the house with a scooty video gone viral on internet)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला घराची पडवी दिसत आहे. काही वेळाने दोन महिला स्कूटीवर येतात आणि काही क्षणांनी त्या घसरुन खाली पडतात. व्हिडिओमध्ये त्यांची स्कूटी एका बाजूला सरकताना दिसत असून दोन्ही महिला दुसऱ्या बाजूला पडल्या आहेत. पण एवढ्यावरच हे थांबत नाही, अजून मजा तेव्हा येते जेव्हा एक व्यक्ती त्या दोघांना उचलण्यासाठी धावत येतो आणि तो देखील खूप वेगाने खाली पडतो. हा व्हिडिओ खरोखरच मजेशीर आहे. या व्हिडिओवर लोक त्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया शेअर करत आहेत. कदाचित या फरशीवर कुणीतरी पाणी टाकलेलं असल्याचं या कुणाच्याच लक्षात आलं नाही, त्यामुळे हे सगळे घसरुन पडले. व्हिडीओ पाहायला जरी भारी वाटत असला तरी, यातील तिघांनाही खूप खरचटलं असणार आहे.

व्हिडीओ पाहा:

हा व्हायरल व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही सर्वजण हा व्हिडिओ black_lover__ox नावाच्या पेजवर पाहू शकता. लोक या व्हिडिओला एवढ्या पसंती देत ​​आहेत की आत्तापर्यंत त्यावर लाखो लाइक्स दिसत आहेत, सोबतच लोक कमेंट करून आपल्या प्रतिक्रियाही शेअर करत आहेत. असे अनेक सोशल मीडिया युजर्स आहेत, जे त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करत आहेत. तसेच मजेदार कॅप्शनही देत ​​आहेत.

लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना एका यूजरने कमेंट केली की, ‘असे स्टंट करण्यापूर्वी खूप सराव केला पाहिजे.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘असे धोकादायक स्टंट करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करणं गरजंचं आहे’ दुसऱ्या यूजरने लिहिले. तुम्ही विम्याची कागदपत्रं जपून ठेवलीत का?’ या व्यतिरिक्त इतर अनेक युजर्सनी या व्हिडिओवर मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

हेही पाहा:

Video: बिबट्या शाळेच्या वर्गात शिरला, आणि त्यानंतर काय घडलं, पाहा हादरवणारा व्हिडीओ!

Video: बटाटे कापणाऱ्या पाकिस्तानी मुलीच्या सौंदर्यावर नेटकरी घायाळ, सोशल मीडियावर अमिनाचीच चर्चा!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.