AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: हात नसलेल्या चिमुरड्याला जेव्हा कृत्रिम हात बसवतात, पाहा त्याची न विसरता येणारी रिएक्शन!

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा दिसत आहे ज्याला हात नाही. पण त्या मुलाला कृत्रिम हात लावताच तो लगेच आनंदीत होतो. कृत्रिम हात लावल्यानंतर, मुलाच्या चेहऱ्यावरचे हास्यच सांगतो की तो किती आनंदी आहे.

Video: हात नसलेल्या चिमुरड्याला जेव्हा कृत्रिम हात बसवतात, पाहा त्याची न विसरता येणारी रिएक्शन!
कृत्रिम हात बसवल्यानंतर चिमुरड्याची प्रतिक्रिया
| Edited By: VN | Updated on: Dec 03, 2021 | 1:34 PM
Share

सोशल मीडिया हे एक असं व्यासपीठ आहे, जिथं अनेक सुंदर आणि प्रेमळ व्हिडीओ पाहायला मिळतात, तुम्ही सर्वांनी हे पाहिले आणि ऐकले असेल की, जगातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. म्हणूनच प्रत्येकाच्या जीवनाचे वेगवेगळे अर्थ आहेत. पण असे अनेक लोक असतात ज्यांना त्यांच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो ज्यांची त्यांना अपेक्षाही नसते. सध्या एका अपंग मुलाचा एक मोठा प्रेरणादायी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि आम्हाला खात्री आहे की, तो व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल. (Very Emotional Viral video of boy joy after getting prosthetic hand people inspired by him)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा दिसत आहे ज्याला हात नाही. पण त्या मुलाला कृत्रिम हात लावताच तो लगेच आनंदीत होतो. कृत्रिम हात लावल्यानंतर, मुलाच्या चेहऱ्यावरचे हास्यच सांगतो की तो किती आनंदी आहे. आता त्याच्या रिएक्शनमुळे मुलाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

सध्या हा व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे आणि याच कारणामुळे व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मूल बसले असून, तो डॉक्टरकडे पाहत असल्याचे दिसून येते. तो जवळून कृत्रिम हात उचलतो आणि मुलाच्या हातात बसवू लागतो. डॉक्टरांना हे करताना पाहून मुलाच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटते. एक मूल हसते जणू त्याला जगातील सर्वात सुंदर भेट मिळाली आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही सर्वजण Amazing Posts नावाच्या पेजवर हा व्हिडिओ पाहू शकता. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. यासोबतच हा व्हिडिओ पाहून लोक खूप भावूक होत आहेत. काही लोकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून आपल्या प्रतिक्रियाही शेअर केल्या आहेत. एका युजरने लिहिले की – खरं तर माझ्यासाठी मुलाच्या आनंदापेक्षा जगात काहीही असू शकत नाही. दुसरीकडे, दुसर्‍या यूजरने लिहिले की, मला वाटते की खरा आनंद तो आहे, ज्यात माणूस सर्व त्रास विसरतो. लोक या व्हिडिओवर बरेच इमोजी देखील शेअर करत आहेत.

हेही पाहा:

Video: सलून आरामात बसून दाढी करणारं माकडं, लोक म्हणाले, भावाचं, आज लग्नय वाटतं!

Video: स्कूटी पार्क करताना स्टंट करण्याचा प्रयत्न, स्कूटी घसरली आणि त्यानंतर नेटकरी पोट धरुन हसले!

 

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!