Viral Video : परदेशी नागरिक झाला हनुमानाचा भक्त, अस्खलित,स्पष्ट आणि दुप्पट वेगाने बोलला हनुमान चालिसा, एकदा हा व्हिडिओ पाहाच
अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणारा निक डियरमैन हा हनुमानाचा निस्सीम भक्त असून त्याचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो तब्बल 2X स्पीडने संपूर्ण हनुमान चालिसा अस्खलितपणे म्हणताना दिसतोय.

भारतीय ग्रंथांमध्ये आणि श्लोकांमध्ये भविष्यातील प्रत्येक संकटांवर मात करण्याचे काही ना काही उपाय लिहिलेले आहेतच. हनुमान चालिसा प्रत्येकाला प्रत्येक संकटांतून बाहेर पडण्याचे मार्ग दाखवते. हजारो शक्तींचे बळ देते. भय, पीडा तारून मानसिक दृष्ट्या भक्काम करते.भारतात जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या मनात आणि मुखात ही हनुमानचालिसा बसलेली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत विदेशी नागरिक सुद्धा अस्खलित हनुमान चालिसा बोलत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अमेरिकातील टेक्सास येथे हा व्यक्ती राहत असून त्याचे नाव निक डियरमैन आहे. निक डियरमैन हा पेशाने होलिस्टिक हेल्थ कोच आहे. हनुमानाचे निस्सिम भक्त आहेत. त्याने त्याच्या अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओत तो जवळपास 2x च्या वेगात म्हणजेच दुपटीने संपूर्ण हनुमान चालिसा बोलताना दिसत आहे. हनुमान चालिसा संस्कृतमध्ये असल्याने या उच्चार वेगाने बोलायला थोडे फार कठीण आहे. या व्हिडिओमुळे हा माणूस दररोज हनुमान चालिसाचा जप करत असणार हे स्पष्ट होत आहे. एक हेल्थ कोच असून सुद्धा धार्मिकेतवर विश्वास आहे आणि त्याची हनुमान चालिसा बोलण्याचा वेग यामुळे भारतीय चकित झाले आहेत.
View this post on Instagram
भारतीयांच्या भन्नाट प्रतिक्रिया
हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला असून आतापर्यंत १४ लाख लोकांनी या व्हिडिओवर लाईक्स केले आहेत. तसेच बऱ्याच भारतील यूजर्सनी निकचे कौतुक केले आहे. अनेकांनी निकच्या स्पष्ट उच्चाराचे आणि भक्तीचे कौतुक केले आहे. परदेशी असून हनुमानासाठी इतकी श्रद्धा आणि विश्वास बघून भारतीयही चक्रावून गेले आहेत.
हनुमान भक्त निक
निक डियरमैन यांच्या अकाउंटवर बरेच असे हनुमानांचे आणि हनुमान चालिसा पठनाचे व्हिडिओ पोस्ट केलेले दिसत आहेत. मातृभाषा इंग्रजी असूनही संस्कृत मधील हनुमान चालिसा इतकी स्पष्टपणे आणि अस्खलित बोलतोय हे पाहून भारतीयांना तोंडात बोटे घातली आहे.
