AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला दिसणारा हा पारवा नाही, तर हा आहे…, व्हिडीओ पाहा आणि जाणून घ्या!

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ आणि काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये एक कबूतर म्हणजे आपल्या गावाकडच्या भाषेत पारवा दिसत आहे. पण थोडं थांबा, कारण या पारव्यासोबत पुढं जे घडतं, त्यामुळेच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

तुम्हाला दिसणारा हा पारवा नाही, तर हा आहे..., व्हिडीओ पाहा आणि जाणून घ्या!
हा पारवा नाही तर हा आहे...बातमी वाचा
| Edited By: | Updated on: Nov 24, 2021 | 12:52 PM
Share

तुमचा जास्तीत जास्त वेळ तुम्ही नक्कीच इंटरनेटवर जात असेल. सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे पाहून प्रश्न पडतो, असं कसं होऊ शकतं? सोशल मीडिया असा एक मंच आहे जिथं मजेदार व्हिडीओंसह आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टीही पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ आणि काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये एक कबूतर म्हणजे आपल्या गावाकडच्या भाषेत पारवा दिसत आहे. पण थोडं थांबा, कारण या पारव्यासोबत पुढं जे घडतं, त्यामुळेच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

ऑप्टिकल इल्युजन केक बेकने हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. बेन कलनने त्यांच्या केकच्या यादीतील एक व्हिडिओ शेअर केला असून तो कबुतराच्या आकाराचा केक आहे. आम्‍हाला खात्री आहे की, तुम्‍हाला इथं दोनदा व्हिडीओ पाहण्याची गरज भासेल, कारण तो केक अगदी पारव्यासारखा दिसतो आहे. सत्य हे आहे की, हा एक व्हॅनिला केक आहे ज्यामध्ये “व्हाईट चॉकलेटचे आणि शुगरपेस्टचं मिश्रण आहे.

व्हिडीओ पाहा:

हा केक बनवण्यासाठी कोणत्याही कबुतराला इजा झालेली नाही. बेन कुलेनने त्याच्या पोस्टमध्ये कबुतराच्या आकाराच्या केकची अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ देखील शेअर केले आहे. एका फोटोत, बेनने कबुतराच्या आकाराच्या केकचा तुकडाही कापला आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बेकिंग – बेन कलन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ते त्यांच्या केकचे अप्रतिम डिझाइन, त्यांचे व्हिडिओ, फोटो त्यांच्या इंस्टाग्रामवर दररोज शेअर करत असतो. त्याचं फॅन फॉलोइंगही खरंच अफलातून आहे. त्याच्या या व्हिडीओवर सोशल मीडिया यूजर्सच्या अनेक प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत आणि बहुतेक यूजर्स त्याच्या कामाचं कौतुक करत आहेत. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करताना एका यूजरने लिहिले, ‘OMG मला हा केक माझ्या वाढदिवशी हवा आहे’ दुसर्‍या यूजरने लिहिले, ‘हा खरोखर प्रतिभावान कलाकार आहे.

हेही पाहा:

Video: पाणी पिण्यासाठी म्हशीने चक्क हापशाचा वापर केला, नेटकरी म्हणाले, आता सांगा, अक्ल बडीं या भैस!

स्ट्रीट फूड चालकाचं भन्नाट सर्व्हिंग, एक टॉस आणि खाद्यपदार्थ थेट ग्राहकाच्या प्लेटमध्ये, पाहा भन्नाट Video

 

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.