AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: दबा धरुन बसलेल्या कुत्र्याला बकरीने धू धू धुतलं, व्हिडीओ पाहून नेटकरी लोटपोट!

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका बकरी आणि कुत्र्याचा आहे, ज्यामध्ये बकरी कुत्र्याची अशी अवस्था करते, की कुत्र्याला तिथून पळण्याशिवाय पर्याय राहत नाही.

Video: दबा धरुन बसलेल्या कुत्र्याला बकरीने धू धू धुतलं, व्हिडीओ पाहून नेटकरी लोटपोट!
बकरीचा कुत्र्यावर हल्ला
| Edited By: | Updated on: Dec 07, 2021 | 11:32 AM
Share

सोशल मीडिया हे एक असं ठिकाण आहे, जिथं आपण दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल झालेले पाहात असतो. यामध्ये माणसांच्या विविध करामतींपासून ते प्राण्यांपर्यंतच्या व्हिडीओंचा समावेश असतो. सोशल मीडियावर ज्या प्राण्यांचे व्हिडिओ सर्वाधिक व्हायरल होतात, त्यामध्ये कुत्रे, मांजर आणि माकडासोबत अनेक प्राण्यांचा समावेश आहे. त्याचे व्हिडिओही लोकांना खूप आवडतात. त्यांची कृत्यं पाहण्यासारखी असतात. काही व्हिडीओ पाहून आपण आश्चर्यचकीत होतो, तर काही व्हिडीओ पाहून पोट धरुन हसतो. आजचा व्हिडीओही असाच आहे, जो तुम्हाला हसवणार याची गॅरंटी. (Animal Fight video Angry Goat thrashed dog badly video goes viral Animal Attack)

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका बकरी आणि कुत्र्याचा आहे, ज्यामध्ये बकरी कुत्र्याची अशी अवस्था करते, की कुत्र्याला तिथून पळण्याशिवाय पर्याय राहत नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका घराच्या बाहेर व्हरांड्यात दोन शेळ्या उभ्या आहेत आणि जवळच एका टेबलाखाली एक कुत्रा लपलेला आहे. हा लपलेला कुत्रा शेळीला दिसतो, आणि त्यानंतर ती संतापते, ती सरळ टेबलाजवळ जाते, आणि आपल्या शिंगाने टेबलाखाली लपलेल्या कुत्र्यावर वार करण्यास सुरुवात करते. कुत्रा अचानक झालेल्या या हल्ल्याने एकदम गांगारुन जातो, आणि त्यानंतर तो तिथून पळण्यातच धन्यता मानतो, कसाबसा हा कुत्रा टेबलाखालून बाहेर पडतो, पण तिथंही शेळी त्याचा पिच्छा सोडत नाही, टेबलाबाहेर निघताच त्याच्यावर आणखी जोरात हल्ला होतो, जीव वाचवून कुत्रा कसा तरी पळून जातो.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडिओ अतिशय धक्कादायक आहे, जो पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं. हा व्हिडिओ asupan.reels.hewani नावाने इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. याला आतापर्यंत 1 लाख 79 हजार व्ह्यूज मिळाले आहेत, तर 5 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे.

त्याचबरोबर अनेकांनी व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत. अनेकांना हा विनोद नाही, तर भयानक प्रकार वाटला, तर काहींनी म्हणजे बकरी कुत्र्याला वाईट पद्धतीने मारत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे, तर काहींना हा विनोद वाटला आहे.

हेही पाहा:

world’s funniest joke | जगात भारी ! सर्वात लोकप्रिय जोक तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या या संबंधी माहिती

लत्या ट्रेनमधून उडी मारण्याचा प्रयत्न जीवाशी, रेल्वे पोलिसांच्या धाडसामुळे प्राण वाचले, पाहा धक्कादायक व्हिडीओ!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.